Join us

Ilker Ayci Air India: टाटाला जबर धक्का! रॉची एन्ट्री होताच इल्केर आयचींनी पाय मागे खेचले; एअर इंडियाचे एमडी होण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 2:44 PM

Ilker Ayci reject offer of Air India: टाटाने दुष्मन देशाच्या व्यक्तीला एअरलाईनचे एवढे मोठे पद कसे काय दिले याबाबत आता सवाल उठू लागले होते.

भारताला नेहमी पाण्यात पाहणारे पाकिस्तान, चीननंतरचे शत्रूराष्ट्र तुर्कीच्या व्यक्तीला एअर इंडियाचे सीईओ, एमडी बनविण्यात येणार होते. यासाठी टाटा ग्रुप प्रयत्नशील होता, काही दिवसांपूर्वीच याची घोषणा झाली होती. परंतू, या प्रकरणी गुप्तचर संस्था रॉची एन्ट्री होताच टाटाला जबर धक्का बसला आहे. 

तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी जवळचे संबंध असलेल्या इल्केर आयची यांना टाटा समूहाने एअर इंडियाच्या सीईओ आणि एमडीपदी नियुक्त केले होते. त्यांची नियुक्ती १ एप्रिलपासून होणार होते. इल्केर हे २०१५ ते २०२१ या काळात तुर्कीश एअरलाईनचे सीईओ होते. यामुळे त्यांचा आगापिछा तपासण्यात येणार होता. 

 टाटाने दुष्मन देशाच्या व्यक्तीला एअरलाईनचे एवढे मोठे पद कसे काय दिले याबाबत आता सवाल उठू लागले होते. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी प्रत्येकवेळी काश्मीरवरून भारतविरोधी भूमिका मांडली आहे. त्यांनी पाकिस्तानची साथ दिली आहे. अनेकदा प्रक्षोभक वक्तव्ये देखील केली आहेत. यामुळे आयची यांचे तुर्की आणि पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. 

यावर आयची यांनीच आता माघार घेतली आहे. ब्लूमबर्गच्या एका वृत्तात आयची यांचे मत घेण्यात आले आहे. "भारतीय मीडियाने माझ्या नियुक्तीबद्दल विविध प्रकारच्या बातम्या चालवल्या. या सर्व बाबींचा विचार करून मी या निर्णयाप्रत आलो आहे की, अशा प्रकारच्या चर्चा सुरू असताना पद स्वीकारणे योग्य नाही.

आयची पुढे म्हणाले, 'टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये माझी नियुक्ती फेब्रुवारीच्या सुरुवातीला जाहीर झाली होती आणि माझा कार्यकाळ 1 एप्रिलपासून सुरू होणार होता. तेव्हापासून मी भारतीय माध्यमांच्या बातम्यांचे बारकाईने निरीक्षण करत होतो. बळजबरीने वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करताना पाहत होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला माझ्या कुटुंबाच्या आनंदाची आणि आरोग्याची काळजी आहे. यामुळे मी एअर इंडियाची ऑफर नाकारली आहे. 

टॅग्स :टाटाएअर इंडिया