BSNL New Logo: देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचा चेहरामोहरा बदलला आहे. कंपनी लवकरच आपल्या ४जी आणि ५जी सेवांची सरुवात करणार असून त्यापूर्वी कंपनीनं एक महत्त्वाचा आणि मोठा बदल केलाय. कंपनीनं मंगळवारी आपला नवा लोगो लाँच केला. यासोबतच त्यांनी ७ नव्या सेवांचीही घोषणा केली.
BSNL स्मॅम फ्री नेटवर्क - स्पॅम-ब्लॉकिंग तंत्रज्ञानामुळे फिशिंग आणि फसवणुकीचे मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातील. तसंच अशा मेसेजेसबाबत ग्राहकांना सतर्क केलं जाणार आहे.
BSNL नॅशनल वायफाय रोमिंग -बीएसएनएलची पहिली एफटीटीएच बेस्ड सिमलेस वाय-फाय रोमिंग सेवा बीएसएनएल ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बीएसएनएलहॉटस्पॉटवर हायस्पीड इंटरनेट वापरण्यास सक्षम करेल. ज्यामुळे त्यांचे इंटरनेट बिल कमी होईल.
BSNL आयएफटीव्ही - बीएसएनएल भारतात पहिल्यांदा फायबर आधारित इन्ट्रानेट टीव्ही सेवा सुरू करणार आहे. एफटीएच नेटवर्कच्या माध्यमातून ५०० पेक्षा अधिक चॅनल पाहता येणारेत.
BSNL proudly unveils its new logo, symbolizing trust, strength, and nationwide reach. Along with this, BSNL introduces seven pioneering initiatives aimed at enhancing digital security, affordability, and reliability, transforming the way India connects with secure, seamless, and… pic.twitter.com/osVhwFrozw
— DD India (@DDIndialive) October 22, 2024
एनी टाईम किऑस्क - स्वयंचलित सिम किऑस्क ग्राहकाला २४/७ सिम खरेदी, अपग्रेड, पोर्ट किंवा सिम बदलण्याची सुविधा देते. सर्चलेस केवायसी आणि मल्टी लँग्वेज यूपीआय/क्यूआर-सक्षम पेमेंट सिस्टीमचादेखील लाभ घेता येणार आहे.
डायरेक्ट टू डिव्हाईस सेवा - भारताची पहिली डायरेक्ट टू डायरेक्ट (D2D) कनेक्टिव्हीटी. उपग्रह आणि ग्राऊंड मोबाइल नेटवर्कला इंटिग्रेट करुन कनेक्टिव्ही देते.
'सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती निवारण' - बीएसएनएलचं स्केलेबल, सुरक्षित नेटवर्क संकटकाळात सरकार आणि मदत एजन्सींसाठी भारतातील पहिल्या गॅरंटीड एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन डिझास्टर रिस्पॉन्ससाठी उपयुक्त ठरेल. आणीबाणीच्या काळात कव्हरेज वाढवण्यासाठी ड्रोन-आधारित आणि बलून-आधारित सिस्टम आहे.
खाणींमध्ये पहिली खासगी ५जी सेवा - बीएसएनएलनं सी-डॅकच्या सहकार्यानं खाण कामासाठी विश्वासार्ह, जलद ५जी कनेक्टिव्हिटी सुरू केली आणि प्रगत एआय आणि आयओटीच्या मदतीने भूमिगत खाणी आणि मोठ्या ओपनकास्ट खाणींमध्ये हाय-स्पीड लो लेटेन्सी कनेक्टिव्हिटी देईल.