SEBI Market News : बाजार नियामक सेबीनं फ्युचर्स आणि ऑप्शनसंदर्भात नवं परिपत्रक जारी केलं आहे. शेअर बाजारातील हेराफेरीला लगाम घालण्यासाठी बाजार नियामकानं एन्ट्री आणि एक्झिटबाबतचे नियम कडक केले आहेत. सेबीनं मार्केट वाइड पोझिशन लिमिट ५०० कोटी रुपयांनी वाढवून १५०० कोटी रुपये केली आहे. डेली कॅश सेगमेंटचं प्रमाण सरासरी १० कोटी रुपयांवरून ३५ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आलं आहे.
याशिवाय मीडियम क्वार्टर सिग्मा ऑर्डर साईज २५ लाखरुपयांवरून ७५ लाख रुपये करण्यात आली आहे. सलग ३ महिने सहामाही सरासरी व्हॉल्यूम बेस्ड स्केलची पूर्तता न केल्यास एक्झिट अट लागू होईल. एक्झिट स्टॉकमध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट सुरू होणार नाहीत तर विद्यमान कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आणण्याची संधी मिळेल.
सेबीची सुधारित मार्गदर्शक तत्त्वं तात्काळ लागू होतील. या सेगमेंटमध्ये हाय क्वालिटी आणि सफिशिअंट मार्केट डेप्थ असलेली कंपनी ठेवणं हे सेबीचं उद्दिष्ट आहे. याशिवाय वाइड पोझिशन लिमिट वाढवून १५०० कोटी रुपये करण्यात आलीये. सलग तीन महिने कंपनीनं हा निकष पूर्ण न केल्यास कंपनीला डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधून वगळण्यात येईल. सध्या या सेगमेंटमध्ये असलेल्या कंपन्यांना ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय. एकदा हा शेअर एफ अँड ओ सेगमेंटमधून बाहेर पडला की, वर्षभर रि-एन्ट्री होणार नाही.