नवी दिल्ली : येणा-या काही वर्षांत नव्या कंपन्यांकडून (स्टार्टअप) तीन लाख नवे रोजगार निर्माण होतील. साधारणत: २0२0 सालापर्यंत हा रोजगार निर्माण होईल. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
मनुष्य विकास क्षेत्रातील जाणकारांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, नव्या कंपन्यांनी गेल्या वर्षीच ५0 ते ६0 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. येणाऱ्या भविष्यात प्रत्येक क्षेत्रातील कंपनीचा नियुक्त्यांबाबतचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, ८0 टक्के लोक स्थिरस्थावर असलेल्या कंपन्यांऐवजी नव्या कंपन्यांत नोकऱ्या करण्यास प्राधान्य देत आहेत.
कौशल्य आकलन क्षेत्रातील कंपनी मेरिटट्रॅकने म्हटले की, भारतात २0२0 सालापर्यंत नव्या कंपन्या अडीच ते तीन लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतात.
मेरिट ट्रॅक इनोव्हेशन्स अँड न्यू प्रॉडक्टस् डेव्हलपमेंटचे महाव्यवस्थापक राजीव मेनन यांनी सांगितले की, नव्या कंपन्या अधिक गतीने प्रगती करीत असलेल्या देशांत भारताचा समावेश होतो.
नव्या कंपन्या देणार ३ लाख नवा रोजगार
येणा-या काही वर्षांत नव्या कंपन्यांकडून (स्टार्टअप) तीन लाख नवे रोजगार निर्माण होतील. साधारणत: २0२0 सालापर्यंत हा रोजगार निर्माण होईल.
By admin | Published: February 22, 2015 11:55 PM2015-02-22T23:55:18+5:302015-02-22T23:55:18+5:30