Lokmat Money > बिझनेस न्यूज > लवकरच येणार १० रुपयांची नवी चलनी नोट

लवकरच येणार १० रुपयांची नवी चलनी नोट

रिझर्व्ह बँकेने लवकरच १० रुपयांची नवी चलनी नोट बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. या नोटेत रुपयाचे प्रतीकात्मक चिन्ह तथा क्रमांकाच्या रकान्यात ‘एन’ अक्षर असेल.

By admin | Published: February 14, 2015 12:54 AM2015-02-14T00:54:47+5:302015-02-14T00:54:47+5:30

रिझर्व्ह बँकेने लवकरच १० रुपयांची नवी चलनी नोट बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. या नोटेत रुपयाचे प्रतीकात्मक चिन्ह तथा क्रमांकाच्या रकान्यात ‘एन’ अक्षर असेल.

A new currency note of Rs 10 will be coming soon | लवकरच येणार १० रुपयांची नवी चलनी नोट

लवकरच येणार १० रुपयांची नवी चलनी नोट

मुंबई : रिझर्व्ह बँकेने लवकरच १० रुपयांची नवी चलनी नोट बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. या नोटेत रुपयाचे प्रतीकात्मक चिन्ह तथा क्रमांकाच्या रकान्यात ‘एन’ अक्षर असेल.
आरबीआयने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. पत्रकानुसार, नव्या नोटेवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असेल. याचे छपाई वर्ष २०१४ आहे.
मध्यवर्ती बँकेच्या मते, नोटेचे उर्वरित डिझाईन ‘महात्मा गांधी शृंखला-२००५’च्या १० रुपयाच्या नोटांप्रमाणेच असणार आहे. यानंतर उर्वरित नोटाही चलनात राहतील. (प्रतिनिधी)

Web Title: A new currency note of Rs 10 will be coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.