Join us

नवी दिल्ली एअरपोर्ट सर्वात ‘बिझी’ , टॉप १० विमानतळांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:03 AM

या विमानतळावर प्रवासी संख्या मात्र वर्ष २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये २१.४ टक्के वाढून ७.२ कोटी झाली.

जगातील सर्वाधिक बिझी असलेल्या टॉप-१० विमानतळांत राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळाचा समावेश झाला आहे. ‘एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल’ (एसीआई) या संस्थेने ही यादी जारी केली आहे. या यादीत आयजीआय विमानतळ दहाव्या स्थानावर आहे.  

वास्तविक, आदल्या वर्षीच्या तुलनेत आयजीआयचे यादीतील स्थान एका पायरीने कमी झाले आहे. आदल्या वर्षी ते ९व्या स्थानावर होते. या विमानतळावर प्रवासी संख्या मात्र वर्ष २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये २१.४ टक्के वाढून ७.२ कोटी झाली. पहिल्या स्थानी ॲटलांटा हर्ट्सफिल्ड-जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळाची प्रवासी संख्या १०.५ कोटी राहिली.  

प्रमुख विमानतळांवर किती प्रवासी वाढले? 

मानांकन    प्रवासी    वाढ 

१ अटलांटा एअरपोर्ट      १०.५    १२%२दुबई इंटरनॅशनल        ८.७    ३२%३ डलास फोर्ट वर्थ          ८.२    ११%४ लंडन हिथ्रो                  ७.९    २८%१० दिल्ली आयजीआयए  ७.२    २१%

टॅग्स :दिल्ली