Lokmat Money > बिझनेस न्यूज > ४३ टक्के कंपन्यांना हवेत नवीन कर्मचारी

४३ टक्के कंपन्यांना हवेत नवीन कर्मचारी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक शुभ वर्तमान आहे. देशातील एकूण कंपन्यांपैकी तब्बल ४३ टक्के कंपन्यांना नव्या कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे

By admin | Published: June 4, 2016 02:48 AM2016-06-04T02:48:25+5:302016-06-04T02:48:25+5:30

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक शुभ वर्तमान आहे. देशातील एकूण कंपन्यांपैकी तब्बल ४३ टक्के कंपन्यांना नव्या कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे

New employees in the air are 43% | ४३ टक्के कंपन्यांना हवेत नवीन कर्मचारी

४३ टक्के कंपन्यांना हवेत नवीन कर्मचारी

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक शुभ वर्तमान आहे. देशातील एकूण कंपन्यांपैकी तब्बल ४३ टक्के कंपन्यांना नव्या कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे. २००८च्या मंदीनंतर प्रथमच देशात एका आर्थिक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय कंपन्यांतून कर्मचारी भरती होणार आहे.
रोजगारजगतात काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली असून, यानुसार नवीन अथवा अनअनुभवी उमेदवारांपासून अनुभवी उमेदवार अशा सर्वच पातळ्यांसाठी कंपन्या कर्मचाऱ्यांच्या शोधात आहेत.
ज्या ४३ टक्के कंपन्या कर्मचारी भरती करणार आहेत, त्यातील सुमारे ३० टक्के कंपन्या एकूण भरतीच्या २५ टक्के नव्या अर्थात, अनअनुभवी किंवा फ्रेशर उमेदवारांची भरती करणार आहेत. ही भरती अर्थातच कंपनीतील प्राथमिक पातळीवरील आहे. तर अनेक कंपन्यांना ४ ते ८ वर्षे अनुभव असा मध्यम अनुभव असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आहे. तर, काही कंपन्यांना वरिष्ठ व्यवस्थापन पातळीवरील एक, दोन आणि तीन क्रमांकासाठीही योग्य व्यक्तीची प्रतीक्षा आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन हा अर्थातच यातील कळीचा मुद्दा आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, कंपनी ज्या उद्योगात आहे त्याच्या स्वरूपानुसार प्राथमिक पातळीवरच्या वेतनाचे प्रमाण ठरवत आहे. पण तरीही, प्रति महिना किमान ७ हजार ते १५ हजार रुपये यादरम्यान वेतन उमेदवारांना मिळत आहे. ज्या लोकांना किमान ४ ते ८ वर्षांचा अनुभव आहे, अशा लोकांना नोकरी बदलताना देण्यात येणाऱ्या वेतनाचे निकष काहीसे वेगळे आहेत. यामध्ये सरासरी किमान १० ते १५ टक्के पगारवाढ हा भाग तर आहेच, पण अनेक प्रकरणांत याही पलीकडे जात संबंधित कर्मचाऱ्याची क्षमता, त्याचा अनुभव आणि त्याने केलेले उल्लेखनीय काम या घटकांना विचारात घेतले जात असून, अशा कर्मचाऱ्यांना ३० टक्क्यांपर्यंत पगारवाढ देण्याची कंपन्यांची तयारी आहे. काही प्रकरणांत तर ही वाढ ५० टक्क्यांपर्यंतही देण्यासाठी कंपन्या उत्सुक असल्याचे रोजगार उद्योगाचे अभ्यासक राजेश कृष्णमूर्ती म्हणाले. वरिष्ठ व्यवस्थापन पातळीवर नोकरी बदलतेवेळी वेतनाच्या मुद्द्याचे निकष आता पूर्णपणे बदलताना दिसत असल्याचेही कृष्णमूर्ती म्हणाले. या पातळीवर विशेषत: दोन आणि एक क्रमांकासाठी ज्या उमेदवारांची निवड होते, त्यांच्या मुलाखतींच्या किमान ५ ते कमाल १० फेऱ्या होतात. पाचव्या अथवा सहाव्या फेरीनंतर वेतन, भत्ते व अन्य सेवा सुविधांचा विषय सुरू होतो, असे कृष्णमूर्ती म्हणाले. (प्रतिनिधी)
आॅनलाइन पोर्टल्सही तेजीत
भारतीय रोजगार बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यासाठी आणि इंटरनेट लोकप्रिय होत असल्यामुळे त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्यासाठी आॅनलाइन जॉब पोर्टलही सध्या तेजीत आहेत. इथूनही कंपन्या आपल्यासाठी योग्य त्या उमेदवाराचा शोध घेत आहेत.
सोशल मीडियावरूनही होणार तपासणी
ज्या कर्मचाऱ्यांच्या निवडीचा विचार करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांची माहिती विविध स्त्रोतातून गोळा केली जाते, त्या स्त्रोतांच्या यादीत आता सोशल मीडियाही गणला जात आहे. संबंधित उमेदवाराचे फेसबुक, टिष्ट्वटर, लिंकडीन अशा सर्व खात्यांचा वेध कंपन्या घेताना दिसत आहेत.

च्अर्थव्यवस्थेच्या विकासातील सेवा क्षेत्राचा वाटा हा ४८ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विस्तार झपाट्याने होताना दिसत आहे.
च्परिणामी, सेवा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या कंपन्यांतून नव्या कर्मचाऱ्यांना मोठी मागणी आहे. तर त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, बांधकाम क्षेत्र, आरोग्य सेवा क्षेत्र, औषधनिर्मिती क्षेत्र, पर्यटन आदी अनेक क्षेत्रांना कर्मचारी भरतीचे वेध लागलेले आहेत.

 

Web Title: New employees in the air are 43%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.