वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले की, भारताच्या वृद्धीदर अंदाजात पुढील वर्षी जानेवारीत सुधारणा करण्यात येणार आहे.
अमेरिकास्थित मानक संस्था मूडीजने भारताच्या सार्वभौम मानांकनात नुकतीच १३ वर्षांनंतर सुधारणा केली आहे. भारताचे मानांकन स्थिर दृष्टिकोनासह बीएए३ वरून बीएए२ करण्यात आले आहे. एस अँड पी ने मात्र भारतीय मानांकनात कोणताही बदल केलेला नाही.
नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राईस यांनी सांगितले की, आम्ही भारताविषयीचा अंदाज सुधारित आहोत. वृद्धीदराचा त्यात समावेश आहे. जानेवारीत आम्ही जागतिक आर्थिक दृष्टिकोन सादर करू तेव्हा ही सुधारणा केली जाईल.
ताज्या आकडेवारीनुसार जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारताचा वृद्धीदर वाढून ६.३ टक्के झाला आहे. जूनच्या तिमाहीत तो ५.७ टक्के होता. भारतीय अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर नाणेनिधीच्या निवेदनाला महत्त्व प्राप्त होते.
नाणेनिधी जानेवारीत देणार नवा अंदाज
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले की, भारताच्या वृद्धीदर अंदाजात पुढील वर्षी जानेवारीत सुधारणा करण्यात येणार आहे. अमेरिकास्थित मानक संस्था मूडीजने भारताच्या सार्वभौम मानांकनात नुकतीच १३ वर्षांनंतर सुधारणा केली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:08 AM2017-12-02T01:08:22+5:302017-12-02T01:08:49+5:30