Lokmat Money > बिझनेस न्यूज > मास्टरकार्डने एसबीआय अ‍ॅपवर सुरू केली ही नवी सुविधा, कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

मास्टरकार्डने एसबीआय अ‍ॅपवर सुरू केली ही नवी सुविधा, कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

SBI News : अशी आहे मास्टरकार्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची ही सुविधा

By बाळकृष्ण परब | Published: November 25, 2020 03:10 PM2020-11-25T15:10:40+5:302020-11-25T15:14:53+5:30

SBI News : अशी आहे मास्टरकार्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची ही सुविधा

The new feature launched by MasterCard on the SBI app will benefit billions of customers | मास्टरकार्डने एसबीआय अ‍ॅपवर सुरू केली ही नवी सुविधा, कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

मास्टरकार्डने एसबीआय अ‍ॅपवर सुरू केली ही नवी सुविधा, कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

Highlightsस्टेट बँक ऑफ इंडियाने काँन्टॅक्टलेस पेमेंट सुरू करण्याची घोषणा केली आहेमास्टरकार्ड कस्टमर्सना आता पैसे काढण्यासाठी कार्ड घेऊन जाण्याची गरज भासणार नाहीग्राहक संपर्करहित पद्धतीने टॅप अँड गो चा वापर करून पेमेंट करू शकतील

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने काँन्टॅक्टलेस पेमेंट सुरू करण्याची घोषणा केली आहे. बँकेने सांगितले की, मास्टरकार्ड कस्टमर्सना आता पैसे काढण्यासाठी कार्ड घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. तर ग्राहक संपर्करहित पद्धतीने टॅप अँड गो चा वापर करून पेमेंट करू शकतील. एसबीआय कार्ड आपल्या अ‍ॅपवर मास्टरकार्ड टोकन सर्व्हिस देणारी देशातील पहिला कार्ड जारीकर्ता बनली आहे.

मास्टरकार्ड आणि एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (एसबीआय कार्ड) ने आज एसबीआय़ कार्ड अ‍ॅपवर कॉन्टॅक्ट लेस पेमेंट सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ग्राहकांना कार्ड स्वाईप करण्याची, टच करण्याची किंवा पिन नंबर टाकण्याची गरज पडणार नाही.

एसबीआयच्या या सुविधेचा वापर करून ग्राहक एकावेळी दोन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतील. दोन हजार रुपयांहून अधिकच्या व्यवहारांसाठी कार्ड पिन नोंदवावी लागेल. एसबीआय कार्ड अ‍ॅपचा वापर करण्यासाठी ग्राहकांना एसबीआय कार्ड मोबाईल अ‍ॅपवर आपल्या कार्डंच रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी अ‍ॅपचे नवे व्हर्जन आवश्यक आहे. रजिस्ट्रेशननंतर पॉईंट ऑफ सेल्स मशिनीवर कार्ड न पकडता फोनच्या माध्यमातून व्यवहार करता येईल.


एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ अश्विनीकुमार तिवारी यांनी या सुविधेच्या शुभारंभप्रसंगी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत गेल्या काही महिन्यांमध्ये कॉन्टॅक्टलेस पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आम्ही एसबीआय कार्डमाध्यमातून ग्राहकांचे जीवन सरळ आणि चांगले बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत. मास्टरकार्डसोबतची ही भागिदारी ग्राहकांना सुविधाजनक डिजिटल पेमेंट ऑप्शन देण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेमध्ये टाकलेले एक पाऊल आहे.

मास्टरकार्डचे विभागीय अध्यक्ष पोरश सिंह यांनी सांगितले की, मास्टरकार्ड भारताच्या सर्वात मोठ्या बँकेसोबत भागीदारी मजबूत करत आहे. मास्टरकार्डला विश्वास आहे की, ही सेवा एसबीआयच्या कार्डधारकांसाठी एक उत्तम मोबाईल बेस्ड पेमेंट सर्व्हिस म्हणून समोर येईल.

Web Title: The new feature launched by MasterCard on the SBI app will benefit billions of customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.