नवी दिल्ली : चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा कुरिअरने विदेशात पाठवून तेथून त्या भारतात आणून बदलून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या व अनिवासी भारतीयांना (एनआयआर) त्या बदलून घेण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली.
भारतीय नागरिकांसाठी नोटा बँकेत भरण्याची मुदत ३० डिसेंबर २०१६ पर्यंत होती. चलनातून बाद झालेल्या नोटा कुरिअरमार्फत विदेशात पाठवण्यात आल्याचे काही प्रकार कस्टम्स अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी कुरिअरमार्फत विदेशात पाठवण्यात येत असलेल्या एक लाख रुपये मूल्यांपेक्षा जास्त नोटा जप्त केल्या, असे कस्टम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी येथे सांगितले.
काही लोकांनी कुरिअरमार्फत या बाद नोटा पुस्तके किंवा इतर वस्तू असल्याचे खोटेच सांगून पाठवायचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. अशा प्रयत्नांमागील हेतू आपले विदेशातील नातेवाईक किंवा मित्रांमार्फत बाद नोटांच्या बदल्यात नव्या नोटा घेण्याचा असू शकतो, असे हा अधिकारी म्हणाला. पंजाबमधून दोन वेळा आॅस्ट्रेलियाला कुरिअर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. हे पार्सल पुस्तकांचे असल्याचे सांगितले गेले होते.
येथील विदेशी टपाल कार्यालयात विदेशात जाणाऱ्या पार्सल्सवर लक्ष ठेवून असलेल्या कस्टम्स अधिकाऱ्यांना त्यात पुस्तके नव्हे तर बाद झालेल्या नोटा आढळल्या. असेच पार्सल कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातीलाही बुक केले गेले होते. त्यात बाद झालेल्या नोटा होत्या. एकूण एक लाख रुपये मूल्याच्या बाद झालेल्या नोटा या कारवायांत जप्त करण्यात आल्या, असे त्याने सांगितले.
अनिवासी भारतीयांचा वापर
देशभरातील विदेशी टपाल कार्यालयांतही असे प्रकार नोंदविले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ या दरम्यान विदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना बाद झालेल्या नोटा बदलून मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च आणि अनिवासी भारतीयांसाठी ३० जूनपर्यंत मुदतदिली होती. नोटा बदलून मिळण्याची सोय फक्त मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई व नागपूर शहरांतच आहे. भारतात येणाऱ्या अनिवासी भारतीयांना रेड चॅनेलमधून जावे लागते. विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्यांकडे त्यांना बाद झालेल्या नोटांचे मू्ल्य किती हे जाहीर करावे लागते व नोटा बदलून घेताना रिझर्व्ह बँकेत सादर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते.
पुस्तकांमधून पैसे पाठवण्याचा प्रकार
पुस्तकांमध्ये लपवून जुन्या नोटा परदेशांमध्ये पाठवल्या जात होत्या. पण परदेशांमध्ये पाठवल्या जाणाऱ्या कुरिअरवर कस्टम
विभाग करडी नजर ठेवून असल्याने हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारे पंजाबहून आॅस्ट्रेलियाला पैसे पाठवणाऱ्यांना ताब्यात
घेण्यात आले आहे. तसेच कोरिया आणि दुबईमध्येही अशाच प्रकारे पैसे पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बाद नोटांसाठी नवा फंडा
चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा कुरिअरने विदेशात पाठवून तेथून त्या
By admin | Published: April 10, 2017 12:45 AM2017-04-10T00:45:00+5:302017-04-10T00:45:09+5:30