नवी दिल्ली : एलपीजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडची गॅस कंपनी इंडेनने ग्राहकांसाठी मोठी सुविधा जाहीर केली आहे. इंडेनच्या माहितीनुसार, आता कोणताही ग्राहक फक्त त्याचे आधार कार्ड दाखवून त्वरित एलपीजी कनेक्शन (LPG connection)मिळवू शकतो. गॅस कनेक्शनसाठी, ग्राहकाला आधार कार्डव्यतिरिक्त इतर कोणतेही डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता नाही. (New Gas Connection Just Show Your Aadhaar Card And Get LPG Connection Instantly With Subsidy)
नवीन शहरात एलपीजी कनेक्शन घेणाऱ्यांसाठी ही मोठी सुविधा असणार आहे. कारण गॅस कंपन्या अनेक प्रकारचे डॉक्युमेंट मागतात. विशेषतः पत्ता पुरावा देणे बंधनकारक आहे. शहरांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडे पत्त्याचा पुरावा नाही. यामुळे त्यांना एलपीजी कनेक्शन मिळण्यात अडचणी येतात. परंतु अशा ग्राहकांना आता सहजपणे सिलिंडर मिळणार आहे.
इंडेनकडून माहितीया नवीन आणि विशेष सुविधेबद्दल इंडेनने माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, 'कोणतीही व्यक्ती आधार दाखवून नवीन एलपीजी कनेक्शन घेऊ शकते. त्याला सुरुवातीला विनाअनुदानित कनेक्शन दिले जाईल. ग्राहक नंतर पत्ता पुरावा सादर करू शकतो. हा पुरावा सादर होताच सिलिंडरवरील अनुदानाचा लाभही दिला जाईल. म्हणजेच जे कनेक्शन आधार आणि पत्त्याच्या पुराव्यासह घेतले जाईल, ते सरकारी अनुदानाच्या लाभाखाली येईल. जर एखाद्या ग्राहकाला लवकरच कनेक्शन मिळवायचे असेल आणि त्याच्याकडे पत्त्याचा पुरावा नसेल, तर तो लगेच आधार क्रमांकाद्वारे या सुविधेचा हक्कदार होईल.'
असे मिळवा एलपीजी कनेक्शन..1. यासाठी तुम्ही आधी जवळच्या गॅस एजन्सीकडे जा.2. त्यानंतर एलपीजी कनेक्शनचा फॉर्म भरा.3. त्यात आधार कार्डचे डिटेल्स द्या आणि फॉर्मसोबत आधार कार्डची प्रत जोडा.4. फॉर्ममध्ये तुमच्या घराच्या पत्त्याबद्दल सेल्फ डिक्लेरेशन करा.5. तुम्ही कुठे राहता आणि घराचा क्रमांक काय आहे? हे यात द्यावे लागेल.6. यानंतर तुम्हाला लगेच एलपीजी कनेक्शन दिले जाईल.7. मात्र, या कनेक्शनसह तुम्हाला सरकारी अनुदानाचा लाभ मिळणार नाही.8. तुम्हाला सिलिंडरची संपूर्ण किंमत मोजावी लागेल.9. जेव्हा तुमचा पत्ता पुरावा तयार असेल, तेव्हा तो गॅस एजन्सीकडे जमा करावा लागेल.10. या पुराव्याची पुष्टी केली जाईल, म्हणून गॅस एजन्सी ते आपल्या कनेक्शनमध्ये वैध दस्तऐवज म्हणून नोंदवेल.11. यासह, तुमचे विनाअनुदानित कनेक्शन अनुदानित कनेक्शनमध्ये रूपांतरित केले जाईल.12. मात्र, सिलिंडर घेताना, तुम्हाला संपूर्ण रक्कम जमा करावी लागेल.13. पण, नंतर अनुदान सरकार तुमच्या बँक खात्यात जमा करेल.
ही योजना सर्व प्रकारच्या सिलिंडर होईल लागूआधार कार्डद्वारे कनेक्शन घेण्याची ही योजना सर्व प्रकारच्या सिलिंडरवर लागू होईल. व्यावसायिक सिलिंडरचा यात समावेश नाही. ही योजना 14.2 किलो, 5 किलोच्या सिंगल, डबल किंवा मिक्स्ड सिलिंडर कनेक्शनसाठी आहे. हाच नियम एफटीएल किंवा फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरसाठीही लागू होतो.
एफटीएस सिलिंडरला छोटा सिलिंडर असेही म्हटले जाते, जो तुम्ही दुकानांमधून देखील खरेदी करू शकता. हे सिलिंडर गॅस एजन्सी किंवा पेट्रोल पंपावरूनही खरेदी करता येते. यासाठी कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट देण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही कोणतेही एक ओळखपत्र दाखवून हा छोटा सिलिंडर खरेदी करू शकता.