नवी दिल्ली : हीरो मोटोकॉर्प या जगातील मोटारसायकल्स व स्कूटर्सच्या सर्वांत मोठ्या उत्पादक कंपनीने १०० सीसी मोटारसायकल ‘एचएफ डीलक्स’ची ‘कॅनव्हास’ ही नवीन श्रेणी लाँच केली.
४ नवीन स्ट्राइप्समुळे एचएफ डीलक्सच्या आकर्षक लूकमध्ये अधिक पडली आहे. ही कॅन्व्हास ब्लॅक एडिशन सुधारित सुरक्षितता व सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांना नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. ट्यूबलेस टायर्स ब्रॅण्डच्या उच्च मूल्य तत्त्वामध्ये अधिक भर घालतात. यूएसबी चार्जर ॲक्सेसरी म्हणून येते. हीरो एचएफ-डीलक्स ५ वर्षांची वॉरंटी आणि ५ मोफत सेवांसह येते. इंधन टाकीची क्षमता वाढविण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ब्रेकिंगमध्ये सुधारणा केली आहे.
ब्रॅण्ड डीएनए कायम राखतानाच स्टाइल, सर्वोत्तम तंत्रज्ञान व कार्यक्षमतेचे योग्य संतुलन या गाडीत आहे. सर्वांत विश्वसनीय ब्रॅण्ड्सपैकी एक मानली जाणारी एचएफ डीलक्स उच्च इंधन बचत, मजबूत व शक्तिशाली इंजिन क्षमता, आरामदायकता, किमान मेंटेनन्स आणि लक्षवेधक फेरविक्री मूल्य यासाठी ग्राहकांची अल्टिमेट निवड आहे.