मुंबई: अॅपल एक्स 2018 सीरिजमधील नव्या फोनच्या लॉन्चिंगची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतशी या फोनबद्दलची चर्चा वाढू लागली आहे. नव्या आयफोनमध्ये ड्युएल सिम सुविधा असल्याची नवी चर्चा सध्या बाजारात सुरू आहे. एँड्रॉईड फोनसाठी ड्युएल सिम हे फिचर नवं नाही. मात्र आयफोनसाठी हे फिचर पूर्णपणे नवीन आहे. आतापर्यंतच्या आयफोनमध्ये कधीही ड्युएल सिम हे फिचर देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे सध्या या बातमीची प्रचंड चर्चा बाजारात आहे. आयफोन एक्स प्लससोबत लॉन्च होणाऱ्या आणखी एका आयफोनमध्ये ड्युएल सिमची सुविधा असेल, असं वृत्त काही संकेतस्थळांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं. आशियाई बाजारासाठी ही सुविधा असलेला फोन अॅपलकडून लॉन्च केला जाऊ शकतो. ड्युएल सिम फोन लॉन्च केल्यास अॅपलचा भारतीय मोबाईल बाजारपेठेतील हिस्सा 2 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जातो. अॅपलकडून यावर्षी तीन फोन लॉन्च करणार आहे. यामधील एक फोन लो बजेट असेल. हा फोनचा डिस्प्ले 6.1 इंचाचा असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच आयडीसी या संशोधन संस्थेनं यंदाच्या वर्षातील दुसऱ्या आर्थिक तिमाहीची माहिती प्रसिद्ध करणारा अहवाल प्रसिद्ध केला. चिनी स्मार्टफोन कंपनी हुवेईनं अॅपलला मागे टाकल्याची माहिती या अहवालात आहे.
भारतीयांना खूष करण्यासाठी आयफोनमध्ये पहिल्यांदाच येणार 'हे' फिचर?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 6:21 PM