भारतातील जगप्रसिद्ध एअर इंडिया या एअरलाईन्सचा ताबा जानेवारीमध्ये टाटा समूहाने घेतल्यानंतर आता कंपनीच्या एअर एशिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्तारा या तीनही कंपन्या एअर इंडिया या मुख्य कंपनीत विलीन करत एकच मोठी कंपनी व मोठा विमान ताफा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. अद्ययावत विमाने तसेच आरामदायी प्रवासासाठी उत्तम अंतर्गत सजावट करण्याचे कामही कंपनीने सुरू केले आहे. त्यातूनच कंपनीने रिब्रँडींगसाठी एअर इंडियाचा नवीन लोगो जारी केला आहे. हा लोगो मस्टक महाराजा शुभांकूरचं लेटेस्ट रूप आहे.
ओठांवर भरदार मिशा, डोईवर आकर्षक फेटा आणि वर्तनात अदब... असे सुखद चित्र दर्शवत प्रवाशांना आश्वस्त करणारे एअर इंडियाचे ‘महाराजा’ हे बोधचिन्ह आता इतिहासजमा झाले आहे. १९४६ पासून जनमानसांत लोकप्रिय असलेले हे बोधचिन्ह बदलण्याची तयारी एअर इंडियाने सुरू केली होती, ती आता पूर्ण झाली असून नवं बोधचिन्ह आणि नवं उड्डाण घेऊन एअर इंडिया अवकाशात झेपावली आहे.
नवी लोगोमध्ये आधुनिक डिझाईन, लाल-पांढऱ्या आणि जांभळ्या रंगांचा नवा कलर शेडही दिसून येतोय. एअर इंडियाचा हा नवा लोगो लाँच करताना, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी म्हटलं की, नवा लोगो हा अमर्यादीत भावनांचा प्रतिक आहे. हा लोगो कंपनीच्या जुन्या व्हिडिओची जागा घेईल. ज्यामध्ये, विशिष्ट नारंगी कोणार्क चक्राने सजलेला एक लाल हंस दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या १२ महिन्यांत आम्ही एक उत्तम टीम बांधली आहे. एअरलाईन्सच्या सर्वच कर्मचाऱ्यांना अपग्रेड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही चंद्रशेखर यांनी म्हटलं. ग्लोबल स्टँडर्सच्या अनुषंगाने ही विमानसेवा निर्णाण केली जाणार आहे. त्यासाठी, विमानांचे आधुनिकरण करण्यात येत असल्याचेही चंद्रशेखर यांन म्हटले.
बॉबी कुक्स यांनी महाराजा बनवला
एअर इंडियाचे तत्कालीन संचालक बॉबी कुक्स यांनी कंपनीसाठी महाराजा या बोधचिन्हाची निर्मिती केली होती. त्यानंतर कंपनीच्या सर्व विमानांवर, लाउंजमध्ये अनेक ठिकाणी महाराजा प्रवाशांना दिसत होता. एअर इंडियाचे नाव काढले तरी अनेकांना आज महाराजा आठवतो. मात्र, एअर इंडिया कंपनी गेल्या जानेवारीमध्ये टाटा समूहाने विकत घेतली. त्यानंतर कंपनीने आपल्या विमानसेवेचा कायाकल्प सुरू केला आहे. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून महाराजा हे बोधचिन्ह आता बदलण्यात आले आहे. दरम्यान, कंपनीचे नवे बोधचिन्ह तयार करण्याचे काम लंडनस्थित एका कंपनीला दिले होते.