ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - 200 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची योजना रिझर्व्ह बँकेने आखली आहे. या वर्षी जूननंतर या नोटा जारी करण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत आरबीआयने 200 रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. जर 200 रूपयांच्या नोटा जारी झाल्या तर काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आलेल्या 2000 रूपयांच्या नोटांनंतरचे हे दुसरे नवे चलन असेल.
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली. लगोलग पाचशे रुपयांची नवी नोटही आणण्यात आली. 200 रुपयांची नोट आणण्याबाबत मात्र कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या; मात्र आता ही नोट आणण्यात येत आहे.
लाइव्ह मिंटने सुत्राच्या हवाल्याने केलेल्या दाव्यानुसार, केंद्र सरकारकडून 200 रुपयांच्या नोटा छपाईची अधिकृतरित्या मंजुरी मिळाल्यानंतर नोटांच्या छापाईला सुरुवात केली जाईल. यापूर्वी 1000 हजाराची नवी नोट चलनात येणार असल्याचे वृत्त होते.
लवकरच चलनात येणार 200 रुपयांची नवी नोट ?
200 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची योजना रिझर्व्ह बँकेने आखली आहे. या वर्षी जूननंतर या नोटा जारी करण्याची शक्यता आहे.
By admin | Published: April 4, 2017 10:56 AM2017-04-04T10:56:58+5:302017-04-04T10:56:58+5:30