Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकियाला आयकरकडून करासंदर्भात नवीन नोटीस

नोकियाला आयकरकडून करासंदर्भात नवीन नोटीस

आयकर विभागाने नोकिया इंडिया या कंपनीला करासंदर्भात नव्याने नोटीस जारी केली आहे. वित्तमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अन्य आकलन वर्षासाठी कर

By admin | Published: October 10, 2015 03:15 AM2015-10-10T03:15:16+5:302015-10-10T03:15:16+5:30

आयकर विभागाने नोकिया इंडिया या कंपनीला करासंदर्भात नव्याने नोटीस जारी केली आहे. वित्तमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अन्य आकलन वर्षासाठी कर

New notice regarding taxation from Nokia to Income Tax | नोकियाला आयकरकडून करासंदर्भात नवीन नोटीस

नोकियाला आयकरकडून करासंदर्भात नवीन नोटीस

नवी दिल्ली : आयकर विभागाने नोकिया इंडिया या कंपनीला करासंदर्भात नव्याने नोटीस जारी केली आहे. वित्तमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अन्य आकलन वर्षासाठी कर मागणीसाठी नोकिया इंडियाला नव्याने नोटीस जारी करण्यात आली आहे. आयटीएटीमधील प्रलंबित प्रकरणाचा या नोटीसशी संबंध नाही, हे स्पष्ट करताना किती रकमेच्या कराची मागणी करण्यात आली आहे, हे मात्र या अधिकाऱ्याने सांगितले नाही.
आयकर विभागाने २००३ मध्ये नोकियाच्या भारतातील कंपनीला २००० कोटी रुपयांच्या कराबाबत नोटीस जारी केली होती. २००६ पासून विदहोल्डिंग टॅक्स नियमांचे उल्लंघन केल्यासंदर्भात ही नोटीस जारी केली होती. नोकियाची मोबाईल कंपनी आता मायक्रोसॉफ्टला विकण्यात आली आहे. तथापि,
कर वादातील चेन्नईस्थित कारखान्याला या सौद्यापासून वेगळे करण्यात आले आहे. फिनलँडच्या या कंपनीचे असे म्हणणे आहे की, परस्पर संमत करारानुसार चालू असलेल्या वाटाघाटीतच या नोटिसेचा समावेश करण्यात यावा. भारत आणि फिनलँडच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या प्रकरणी कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल. कर विभागाकडून करण्यात आलेला दावा आधीच्या वादासारखाच आहे. त्यामुळे आम्ही याबाबत काहीही सांगायचे नाही, असे नोकियाने सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: New notice regarding taxation from Nokia to Income Tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.