Join us

New PF Withdrawal Rule: पीएफचे पैसे काढण्याचे नियम बदलले; निकड असते म्हणून... वेळीच मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 7:39 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढण्यावर लावण्यात येणाऱ्या करात बदल केला आहे.

जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आली आहे. सरकारने १ एप्रिल २०२३ पासून पीएफचे पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. चार दिवसांपूर्वी मांडलेल्या अर्थसंकल्पात यामध्ये बदल करण्यात आले आहेत. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढण्यावर लावण्यात येणाऱ्या करात बदल केला आहे. पॅन लिंक नसल्यास, पैसे काढताना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस आकारला जाणार आहे. बदललेल्या नियमाचा फायदा अशा पीएफ धारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत. जर खातेदाराने ५ वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागतो. 5 वर्षांनंतर कोणताही टीडीएस आकारला जात नाही.

यामुळे याचा फायदा नवीन नोकरी लागणाऱ्यांना होणार आहे. याबरोबर आणखी एक बदल म्हणजे TDS साठी 10,000 रुपयांची किमान थ्रेशोल्ड मर्यादा देखील बजेट 2023 मध्ये काढून टाकण्यात आली आहे. परंतू, लॉटरी आणि कोडींच्या बाबतीत, 10,000 रुपयांच्या मर्यादेचा नियम लागू राहील. एका आर्थिक वर्षात एकूण १० हजारांपर्यंत टीडीएस कापला जाणार नाही. त्यानंतर टीडीएस कापला जाईल.

ज्या लोकांकडे पॅन कार्ड आहे त्यांना कमी टीडीएस भरावा लागतो. एखाद्याचे पॅनकार्ड ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केले नसेल तर त्याला 30% पर्यंत टीडीएस भरावा लागत होता. आता तो २० टक्के झाला आहे. जर 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली जात असेल आणि पॅन कार्ड उपलब्ध असेल तर 10% टीडीएस आकारला जाईल. परंतु जर पॅन नसेल तर त्याला आता 30% ऐवजी 20% टीडीएस भरावा लागेल. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीअर्थसंकल्प 2023