Lokmat Money > बिझनेस न्यूज > ब्रॉडकास्टर्सच्या नवीन दरामुळे टीव्ही ग्राहकांवर कुऱ्हाड

ब्रॉडकास्टर्सच्या नवीन दरामुळे टीव्ही ग्राहकांवर कुऱ्हाड

सर्वाधिक टीआरपी असलेल्या वाहिन्या बुकेमधून बाहेर काढण्याचा निर्णय ब्रॉडकास्टर्सनी घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 07:31 AM2020-01-23T07:31:00+5:302020-01-23T07:31:10+5:30

सर्वाधिक टीआरपी असलेल्या वाहिन्या बुकेमधून बाहेर काढण्याचा निर्णय ब्रॉडकास्टर्सनी घेतला आहे.

new rate of broadcasters for TV Channels | ब्रॉडकास्टर्सच्या नवीन दरामुळे टीव्ही ग्राहकांवर कुऱ्हाड

ब्रॉडकास्टर्सच्या नवीन दरामुळे टीव्ही ग्राहकांवर कुऱ्हाड

मुंबई : सर्वाधिक टीआरपी असलेल्या वाहिन्या बुकेमधून बाहेर काढण्याचा निर्णय ब्रॉडकास्टर्सनी घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या वाहिन्या पाहण्यासाठी आता बुकेव्यतिरिक्त स्वतंत्रपणे शुल्क भरावे लागणार आहे. ट्रायच्या नवीन नियमावलीमुळे ग्राहकांना कमी किमतीत जास्त वाहिन्या पाहता येतील असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात प्रेक्षकांचा मासिक खर्च वाढणार आहे.

ब्रॉडकास्टर्सना हव्या असलेल्या वाहिन्या बुकेमध्ये देण्यात आल्या आहेत, असा आरोप शिव केबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी केला. २०१८च्या तुलनेत गतवर्षी केबलच्या मासिक दरात सुमारे ८० ते १०० रुपये वाढ झाली होती. आता आणखी वाढ झाल्याने हे दर २०१८च्या तुलनेत सुमारे दुप्पट होण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे. बुके तयार करण्याचा अधिकार ब्रॉडकास्टर्सकडे असल्याने ते आपली मनमानी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ट्रायने १३० रुपयांमध्ये २०० निशुल्क वाहिन्या दाखवण्याचे निर्देश सरकार असताना कामगारमंत्री या नात्याने नवाब मलिक यांनी हे विधेयक आणले होते. पण भारनियमनाच्या प्रश्नामुळे रात्रभर दुकाने चालू ठेवू नयेत, असा निर्णय घेतला. नंतर २०१६ मध्ये केंद्रात भाजप सरकारने ‘मॉडेल शॉप अ‍ॅन्ड एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ केला. तो राज्यात लागू करण्यासाठी जुलै २०१७ मध्ये अधिवेशनात दुरुस्ती विधेयक आणले आणि संमतीनंतर राज्यपालांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी त्यावर सह्या केल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले. लोकहितास्तव व्यापारी संकुले, मॉल वा कोणत्याही आस्थापनांच्या बंद व उघडण्याच्या वेळा ठरवता येतील, अशी तरतूद त्या कायद्यात आहे. त्यासाठी वेगळा आदेश काढावा लागेल. तसा आदेश आजपर्यंत काढला नाही. पण कायदा राज्यात लागू आहेच. त्यामुळे कोणी व्यवसाय रात्रभर सुरू ठेवत असेल तर त्याच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.

बुकेचे बदललेले दर

कंसात पूर्वीचे दर
झी फॅमिली पॅक हिंदी - ४३ रु. (३९)
झी फॅमिली पॅक मराठी - ४५ रु. (३९ )
कलर्स वाला हिंदी बजेट - २५ रु. (२२)
कलर्स वाला हिंदी व्हॅल्यू प्लस - २८ रु. (२५ )
कलर्स वाला हिंदी फॅमिली - ३३ रु. (३०)
हॅपी इंडिया स्पोटर््स ४९ - ४९ रु. (३९)
हॅपी इंडिया हिंदी प्लॅटिनम - ७९ रु. (६९)
हॅपी इंडिया मराठी एचडी - ७० रु. (५९)

Web Title: new rate of broadcasters for TV Channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.