नवी दिल्ली : सकल देशी उत्पादनाचे (जीडीपी) नवे दर शास्त्रीय पद्धतीवर आधारित असल्याचे सांगून नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी त्याबद्दल होणारी टीका फेटाळून लावली.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पनगढिया म्हणाले की ‘जीडीपीच्या आकड्यांचा आधार हा शास्त्रीय असून तो आमच्या निष्कर्षांशी जुळत नाही, म्हणून आम्ही तो फेटाळून लावू शकत नाही. उलट आम्ही आमची विचार करण्याची दिशा बदलायला हवी.’ केंद्रीय सांख्यिकी संघटनेने (सीएसओ) राष्ट्रीय उत्पन्नाची नवी शृंखला स्वीकारली आहे व तिचा आधार २०११-२०१२ मधील किमतीचा ठेवण्यात आला आहे. नव्या शृंखलेनुसार २०१३-२०१४ मधील सकल देशी उत्पादनाचा दर ६.९ टक्के होईल. हाच दर जुन्या गणनेनुसार ४.७ टक्के निश्चित करण्यात आला होता. याचप्रमाणे २०१२-२०१३ तील विकास दर ४.५ टक्के बदलून घेऊन ५.१ टक्के करण्यात आला आहे.२०१४-२०१५ मध्ये आर्थिक विकास दर ७.३ टक्के असेल. हाच दर यापूर्वी ७.४ टक्के ठरविण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यमसह अनेक तज्ज्ञ नव्या शृंखलेबद्दल साशंक आहेत.
जीडीपीचे नवे दर शास्त्रीय पद्धतीवर आधारित-पनगढिया
By admin | Published: July 05, 2015 11:16 PM