नवी दिल्ली : आता लवकरच आपल्या हातात नवीन 500 आणि 200 रुपयांच्या नोटा येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) 500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात येणार आहेत. यासंबंधीची माहिती भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. महात्मा गांधी सिरीज असलेल्या नव्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे.
200 रुपयांची नोट : भारतीय रिझर्व्ह बॅंक महात्मा गांधी सिरीज असलेली 200 रुपयांची नवीन नोट जारी करणार आहे. या नोटांवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे. 200 रुपयांच्या नवीन नोटांची डिझाइन आधीच्या नोटांसारखीच असणार आहे. तसेच, 200 रुपयांच्या नवीन नोटा व्यवहारात आणल्यानंतर आधीच्या नोटाही स्वीकारल्या जाणार आहेत.
Issue of ₹ 200 Denomination Banknotes in Mahatma Gandhi (New) Series bearing the signature of Shri Shaktikanta...https://t.co/QxOPLPFL3R
— ReserveBankOfIndia (@RBI) April 23, 2019
500 रुपयांची नोट : भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून जारी करण्यात येणाऱ्या 500 रुपयांच्या नोटांवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे. या नोटा सुद्धा बॅंक महात्मा गांधी सिरीजच्या असणार आहेत. 500 रुपयांच्या नवीन नोटांची डिझाइन आधीच्या नोटांसारखीच असणार आहे. तसेच, 500 रुपयांच्या नवीन नोटा व्यवहारात आणल्यानंतर आधीच्या नोटाही स्वीकारल्या जाणार आहेत.
Issue of ₹ 500 Denomination Banknotes in Mahatma Gandhi (New) Series bearing the signature of Shri Shaktikanta...https://t.co/Qj2rTFvUIr
— ReserveBankOfIndia (@RBI) April 23, 2019