Join us

Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:15 AM

New Rule SEBI Demat Account : सेबीनं तुमच्या डिमॅट खात्याशी निगडित एका नियमात बदल केला आहे. पाहूया काय आहे हा नियम आणि कधीपासून होणार बदल.

New Rule SEBI Demat Account : सर्वप्रथम आम्ही तुम्हाला डिमॅट खात्यातून पेआऊटचा अर्थ काय आहे हे सांगतो. जर तुम्ही तुमचे कोणतेही शेअर्स किंवा इतर इन्स्ट्रूमेंट बॉण्ड्स वगैरे विकून पैसे काढले आणि ते बँक खात्यात ट्रान्सफर केले तर या प्रक्रियेला पेमेंट पेआउट म्हणतात. अनेकदा तुमच्या डिमॅट खात्यात पैसे शिल्लक राहतात आणि तुम्ही त्यांचा वापर करत नाही, तर ते क्लिअरन्स सर्व्हिसच्या माध्यमातून पुन्हा तुमच्या बँक खात्यात पोहोचतात. या सेवेला डीमॅट पेआऊट असेही म्हणतात. सेबीनं यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे.

बाजार नियामक सेबीनं गुरुवारी, ग्राहकांच्या डीमॅट खात्यांमधून सिक्युरिटीच्या थेट पे-आऊटसेबंधीच्या गाईडलाईन्स लागू करण्याची डेडलाईन वाढून ११ नोव्हेंबर केली आहे. यापूर्वी हा नियम १४ ऑक्टोबरपासून लागू होणार होता. डायरेक्ट पेआऊट सिस्टीमअंतर्गत क्लिअरिंग कॉर्पोरेशन (सीसी) थेट गुंतवणूकदारांच्या खात्यात सिक्युरिटीज ट्रान्सफर करतात; ही नवी प्रणाली अद्याप लागू झालेली नाही.

५ जून रोजी परिपत्रक

५ जून रोजी सेबीने एक परिपत्रक जारी केलं होतं, ज्यात क्लिअरिंग कॉर्पोरेशनला (सीसी) ऑफिशिअल एफिशिअन्सी सुधारण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी पेमेंट सिक्युरिटी थेट ग्राहकांच्या डिमॅट खात्यात जमा करणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. सध्या क्लिअरिंग कॉर्पोरेशन सिक्युरिटीचं पेआऊट ब्रोकरच्या पूल अकाऊंटमध्ये क्रेडिट करतं आणि नंतर संबंधित ग्राहकांच्या डीमॅट अकाऊंटमध्ये क्रेडिट केलं जातं.

काय आहेत गाईडलाईन्स?

पेआऊटची वेळ दुपारी १.३० वरून ३.३० करण्यात आली आहे, ज्यामुळे एक्सचेंजकडून पेमेंट केल्यानंतर एका दिवसाऐवजी त्याच दिवशी सिक्युरिटीज ग्राहकांच्या खात्यात जमा होतील. सीसीकडून ५ ऑगस्टपर्यंत अंतिम ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे बाजाराला जारी करायची होती. तथापि, ब्रोकर्स इंडस्ट्री स्टँडर्डफोरममध्ये (ब्रोकर्स आयएसएफ) सल्लामसलत केल्यानंतर सीसीनं ऑगस्टच्या अखेरीस मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

गुरुवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, आढावा बैठक आणि ब्रोकर्स फोरमच्या निवेदनानंतर सेबीने अंमलबजावणीची तारीख ११ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. सेबीनं एका वेगळ्या परिपत्रकात टी+१ रोलिंग सेटलमेंट अंतर्गत सिक्युरिटीज भरण्याच्या वेळेत बदल करण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :सेबीशेअर बाजार