Lokmat Money > बिझनेस न्यूज > एजंटासाठी नवे नियम -इरडा

एजंटासाठी नवे नियम -इरडा

बँकेसारख्या कॉर्पोरेट एजंटासाठीच्या नियमांना भारतीय विमा नियामक प्राधिकरण (इरडा) लवकरच अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2015 09:49 PM2015-08-07T21:49:29+5:302015-08-07T21:49:29+5:30

बँकेसारख्या कॉर्पोरेट एजंटासाठीच्या नियमांना भारतीय विमा नियामक प्राधिकरण (इरडा) लवकरच अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे

New rules for Agent - | एजंटासाठी नवे नियम -इरडा

एजंटासाठी नवे नियम -इरडा

हैदराबाद : बँकेसारख्या कॉर्पोरेट एजंटासाठीच्या नियमांना भारतीय विमा नियामक प्राधिकरण (इरडा) लवकरच अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे, असे इरडाचे चेअरमन टी.एस. विजयन यांनी सांगितले.
यासंदर्भातील मार्गदर्शकतत्त्वांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरीनंतर राजपत्रात प्रकाशित करण्याआधी कायद्याच्या दृष्टीने मंजुरी घ्यावी लागेल. नवीन मार्गदर्शतत्त्वानुसार कॉर्पोरेट एजंटला आता कमाल तीन विमा कंपन्यांची निवड करता येईल. सद्य:स्थितीत दोन विमा कंपन्यांची निवड करणे जरूरी आहे.
अधिसूचना तीन ते चार आठवड्यांत जारी होऊ शकते. नवीन नियम १ एप्रिलपासून पूर्णत: लागू करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: New rules for Agent -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.