हैदराबाद : बँकेसारख्या कॉर्पोरेट एजंटासाठीच्या नियमांना भारतीय विमा नियामक प्राधिकरण (इरडा) लवकरच अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे, असे इरडाचे चेअरमन टी.एस. विजयन यांनी सांगितले.यासंदर्भातील मार्गदर्शकतत्त्वांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरीनंतर राजपत्रात प्रकाशित करण्याआधी कायद्याच्या दृष्टीने मंजुरी घ्यावी लागेल. नवीन मार्गदर्शतत्त्वानुसार कॉर्पोरेट एजंटला आता कमाल तीन विमा कंपन्यांची निवड करता येईल. सद्य:स्थितीत दोन विमा कंपन्यांची निवड करणे जरूरी आहे. अधिसूचना तीन ते चार आठवड्यांत जारी होऊ शकते. नवीन नियम १ एप्रिलपासून पूर्णत: लागू करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एजंटासाठी नवे नियम -इरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2015 9:49 PM