Lokmat Money > बिझनेस न्यूज > सिमकार्ड खरेदीसाठीचे नवे नियम आजपासून; अन्यथा १० लाखांपर्यंत दंड

सिमकार्ड खरेदीसाठीचे नवे नियम आजपासून; अन्यथा १० लाखांपर्यंत दंड

बल्क सीम कार्ड म्हणजे मोठ्या प्रमाणात सीम कार्डची खरेदी करताना आणि नवीन सीम खरेदी करतानाही नव्या नियमांची अंमलबजावणी ग्राहकांना करावी लागणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 08:20 AM2023-12-01T08:20:46+5:302023-12-01T08:37:24+5:30

बल्क सीम कार्ड म्हणजे मोठ्या प्रमाणात सीम कार्डची खरेदी करताना आणि नवीन सीम खरेदी करतानाही नव्या नियमांची अंमलबजावणी ग्राहकांना करावी लागणार आहे

New rules for SIM card purchase from today; Otherwise fine up to 10 lakhs | सिमकार्ड खरेदीसाठीचे नवे नियम आजपासून; अन्यथा १० लाखांपर्यंत दंड

सिमकार्ड खरेदीसाठीचे नवे नियम आजपासून; अन्यथा १० लाखांपर्यंत दंड

नवी दिल्ली - मोबाईलमधील सिमकार्डसंबंधित नवीन नियमावली १ डिसेंबर २०२३ म्हणजेच आजपासून लागू होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच हे बदल होणार होते. मात्र, सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून मोबाईलधारकांना दिलासा दिला होता. त्यामुळे, आजपासून सीम खरेदी करताना तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. देशातील सायबर फ्रॉड कमी करण्यासाठी सरकारने हे नियम बनवल्याचं सांगण्यात येत आहे. 

बल्क सिमकार्ड म्हणजे मोठ्या प्रमाणात सीम कार्डची खरेदी करताना आणि नवीन सीम खरेदी करतानाही नव्या नियमांची अंमलबजावणी ग्राहकांना करावी लागणार आहे. नवीन सीम खरेदी करताना ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक सखोल माहिती द्यावी लागणार आहे. खोट्या सीमचा वापर करुन होणाऱ्या गुन्हेगारीला यामुळे आळा बसेल.  

आता जे दुकानदार सिमकार्डाची घाऊक खरेदी करतात, अशा विक्रेत्यांची वैयक्तिक पोलिस पडताळणी होणार आहे. तसेच, त्यांच्यामार्फत ज्या सीमकाडांची विक्री होते ती कुठे होते, कुणाला होते, सीमकार्ड खरेदी करणाऱ्या व्यक्तीची आवश्यक कागदपत्रे संबंधित विक्रेत्याने नीट पडताळून त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवला आहे का, याचीदेखील तपासणी होणार आहे. 

१० लाख रुपयांपर्यंतचा दंड

नवीन नियमांचे पालन न केल्यास किंवा त्यात हेराफेरी दिसून आल्यास १० लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. 

९० दिवसांनंतरच दुसऱ्याकडे सीम सुरू होणार

एक ग्राहक जास्तीत-जास्त ९ सीमकार्ड स्वत:च्या ओळखपत्रावर खरेदी करुन शकणार आहे. जर तुम्ही एखादे सीम कार्ड डिएक्टीव्हेट केले, तर ९० दिवसानंतरच ते सीम दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये अॅक्टीव्ह होईल.  

म्हणून नियमावली कडक

सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने देशभरामध्ये मोबाइल सीमकार्डाची विक्री करणाऱ्या तब्बल ६७ हजार विक्रेत्यांची यादीच सरकारच्या हाती लागली आहे. या प्रकरणांत देशभरात एकूण ३०० एफआयआरदेखील पोलिसांनी नोंदवले आहेत तर, या विक्रेत्यांच्या मार्फत विक्री झालेली तब्बल ५२ लाख अवैध सीमकार्ड सरकारने बंद केली आहेत. अवैध सीमकार्ड विक्री व्यवहारांची व्याप्ती समजून घेण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.
 

Web Title: New rules for SIM card purchase from today; Otherwise fine up to 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.