Lokmat Money > बिझनेस न्यूज > कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत नवे नियम

कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत नवे नियम

नोंदणीकृत कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळाने (सेबी) नियमांमध्ये सुधारणा केली

By admin | Published: January 16, 2017 12:19 AM2017-01-16T00:19:01+5:302017-01-16T00:19:01+5:30

नोंदणीकृत कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळाने (सेबी) नियमांमध्ये सुधारणा केली

New rules regarding merger of companies | कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत नवे नियम

कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत नवे नियम

नवी दिल्ली-  नोंदणीकृत कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळाने (सेबी) नियमांमध्ये सुधारणा केली असून, समभागधारकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न त्यामधून केला जात आहे.
नवीन बदलानुसार एखाद्या खूप मोठ्या अनोंदणीकृत कंपनीला एखाद्या छोट्या कंपनीमध्ये विलीन होऊन आपली नोंदणी करण्याची मुभा असणार नाही. याबाबतचे नियम कडक करण्यात आले आहेत.
अनोंदणीकृत कंपनीला नोंदणीकृत कंपनीमध्ये विलीनीकरणाला तेंव्हाच मान्यता मिळेल जेव्हा नोंदणीकृत कंपनीच्या समभागांची नोंदणी संपूर्ण देशात सुलभपणे व्यवहार होणाऱ्या बाजारात असेल. याशिवाय विलीनीकरणानंतर क्युआयबीचा वाटा एकूण शेअरधारकांच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये.

Web Title: New rules regarding merger of companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.