Lokmat Money > बिझनेस न्यूज > Shark Tank India Season 3 मध्ये नव्या शार्कची एन्ट्री, तुम्ही ओळखता का 'या' स्टार्टअप फाऊंडरना?

Shark Tank India Season 3 मध्ये नव्या शार्कची एन्ट्री, तुम्ही ओळखता का 'या' स्टार्टअप फाऊंडरना?

शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सीझनमध्ये आणखी एका नव्या शार्कची एन्ट्री झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:21 PM2023-10-14T14:21:47+5:302023-10-14T14:22:57+5:30

शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सीझनमध्ये आणखी एका नव्या शार्कची एन्ट्री झाली आहे.

New shark entry in Shark Tank India Season 3 do you know these starter founders inshorts azhar iqubal | Shark Tank India Season 3 मध्ये नव्या शार्कची एन्ट्री, तुम्ही ओळखता का 'या' स्टार्टअप फाऊंडरना?

Shark Tank India Season 3 मध्ये नव्या शार्कची एन्ट्री, तुम्ही ओळखता का 'या' स्टार्टअप फाऊंडरना?

शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India Season 3) तिसऱ्या सीझनमध्ये आणखी एका नव्या शार्कची एन्ट्री झाली आहे. ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल आणि झोमॅटोचे सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांनी हे या सीझनमध्ये दिसणार असल्याचं आधीच स्पष्ट झालंय. परंतु आता इनशॉर्ट्स आणि पब्लिक अॅपचे सह-संस्थापक आणि सीईओ अझहर इक्बाल हे नवे शार्क म्हणून या सीझनमध्ये दिसतील. १३ ऑक्टोबरला शार्क टँक इंडियाचा नवीन प्रोमो रिलीज झाला. यामध्ये अझहर इक्बालही दिसत आहेत.

शार्क टँक इंडियानं जारी केलेल्या प्रोमोमध्ये असं दिसून येतंय की एक एक करून सर्व शार्क्स दूर जात आहेत आणि अखेर अझहर इक्बाल हसताना दिसत आहेत. शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन कधी सुरू होईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा सीझन वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला लाइव्ह जाण्याची शक्यता आहे. अझहर इक्बाल यांच्या आधी रितेश अग्रवाल आणि दीपिंदर गोयल यांनी त्याच्या एन्ट्रीबद्दल माहिती देण्यात आली होती. शार्क टँक इंडियानं आपल्या प्रोमोद्वारे अझहर इक्बाल यांच्या एन्ट्रीची माहिती दिली.



रितेश अग्रवालही दिसणार
रितेश अग्रवालच्या एन्ट्रीबद्दल आणि सर्व शार्क्सबद्दल यापूर्वी अपडेट देण्यात आलं होतं. "जेव्हा मी उद्योजक म्हणून सुरुवात केली, तेव्हा साधनांची कमतरता होती. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये प्रत्येकाच्या मदत करण्याच्या स्वभामुळे मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली," असं रितेश अग्रवाल म्हणाले. ज्याप्रकारे त्यांना इतरांनी मदत केली, त्याप्रमाणे आपल्यालाही इतरांची मदत करायची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपण अनेक स्टार्टअप्सना मदत केली आहे. Naropa Fellowship द्वारे आपण अनेक उद्योजकांना मदत केली असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Web Title: New shark entry in Shark Tank India Season 3 do you know these starter founders inshorts azhar iqubal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.