Join us  

फेसबुक वापरकर्त्यांना मिळाले नवे ‘स्टोरीज्’ फीचर

By admin | Published: March 30, 2017 12:56 AM

फेसबुकला आता ‘स्टोरीज्’ नावाचे नवे फिचर मिळाले आहे. हे कॅमेरा फिचर असून, त्यातून आपल्या फोटो

न्यू यॉर्क : फेसबुकला आता ‘स्टोरीज्’ नावाचे नवे फिचर मिळाले आहे. हे कॅमेरा फिचर असून, त्यातून आपल्या फोटो आणि व्हिडीओंना इफेक्ट देणे वापरकर्त्यांना शक्य होणार आहे.‘फेसबुक स्टोरीज्’ या नावाचे हे फिचर स्नॅपचॅटचे क्लोन आहे. या फिचरद्वारे वापरकर्त्यांना आपला कंटेंट सामायिक करता येईल. मोबाइलवर न्यूज फीडच्या वर हे फिचर दिसेल. इन्स्टाग्रामच्या २४ अव्हर स्लाईडशोप्रमाणे ते काम करील. फेसबुक कॅमेरा प्रॉडक्ट मॅनेजर कॉनर हेज यांनी टेक्नॉलॉजी वेबसाईट ‘टेक क्रंच’ला सांगितले की, लोक फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सामायिक करतात.टेक्स अफटेड्स हा फेसबुकचा प्राथमिक सामायिक पर्याय आहे. १0 वर्षांनंतर फेसबुक आता अन्य पर्यायाकडे वळत आहे.आपल्या पोस्ट वापरकर्ते नव्या ‘फेसबुक डायरेक्ट’च्या माध्यमातून मित्रांच्या न्यूजफीडला सामायिक करू शकतील. यावरील वैयक्तिक व्ह्युजुअल मेसेजेस काही काळानंतर आपोआप अदृश्य होतात.त्यासाठी ‘स्टोरीज्’ हे फिचर अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल. इतर अ‍ॅप्समध्ये ते अत्यंत चांगले काम करीत असल्याचे दिसून आले आहे. स्नॅपचॅटने याला खऱ्या अर्थाने जन्म दिला आहे. हेज यांच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्राम स्टोरीज् वेगाने लोकप्रिय झाले आहे. दररोज १५0 दशलक्ष त्याचा वापर करतात. त्यामुळे फेसबुकने स्वत:चे स्टोरीज् सुरू करण्याचे ठरविले. जानेवारीत त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. ते सार्वजनिक करण्याआधी १२ देशांत त्याचा विस्तार करण्यात आला होता.