Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या आयकरदात्या कंपन्यांचा रास दांडिया

नव्या आयकरदात्या कंपन्यांचा रास दांडिया

आताच वित्तमंत्र्यांनी काही कंपनी करदात्यांसाठी आयकरात सुधारणा आणल्या आहेत. दांडिया खेळताना सावध राहून खेळावे लागते तसे या कंपनी आयकर दात्याला कसे लक्ष द्यावे लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:24 AM2019-09-30T05:24:06+5:302019-09-30T05:24:54+5:30

आताच वित्तमंत्र्यांनी काही कंपनी करदात्यांसाठी आयकरात सुधारणा आणल्या आहेत. दांडिया खेळताना सावध राहून खेळावे लागते तसे या कंपनी आयकर दात्याला कसे लक्ष द्यावे लागेल?

New taxpayer news | नव्या आयकरदात्या कंपन्यांचा रास दांडिया

नव्या आयकरदात्या कंपन्यांचा रास दांडिया

- उमेश शर्मा  

अर्जुन : (काल्पनिक पात्र) : कृष्णा, नवरात्रीचा सण आला आणि सगळीकडे उत्साह दिसत आहे. आताच वित्तमंत्र्यांनी काही कंपनी करदात्यांसाठी आयकरात सुधारणा आणल्या आहेत. दांडिया खेळताना सावध राहून खेळावे लागते तसे या कंपनी आयकर दात्याला कसे लक्ष द्यावे लागेल?
कृष्ण : (काल्पनिक पात्र): अर्जुना, वित्तमंत्र्यांनी आयकर कायद्यात कंपनी करदात्यांसाठी काही सुधारणा केल्याने अर्थव्यवस्थेत गती येईल. या सुधारणा आकारणी वर्ष एप्रिल २0२0 पासून अमलात येतील. या रास दांडियाचे मैदान म्हणजे आयकर कायदा, खेळणारे म्हणजे कंपनी करदाता होय. या दांडियात फक्त कंपनी करदात्यांसाठी प्रवेश आहे आणि बिगर कंपनी करदात्यांना अर्थात वैयक्तिक व्यक्ती, भागीदारी संस्थांना प्रवेश नाही. खूप मनोरंजक होईल हा कंपनी करदात्यांचा रास दांडिया.
अर्जुन : कृष्णा, किती प्रकारचे कंपनी खेळाडू खेळणार या दांडियात?
कृष्ण : अर्जुना, तीन प्रकारचे खेळाडू कंपनी दांडिया खेळू शकतात ते खालीलप्रमाणे :
१) पहिला उत्साही खेळणारा म्हणजे घरगुती मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या नवीन कंपन्या ज्यांना आयकर १५ टक्के लागणार. हा नवीन प्रवेशक आहे या रास दांडियात.
२) दुसरा थोडा वयस्कर आणि संभ्रमित परंतु उत्साहीपणे खेळणारे म्हणजे जुने कंपनी करदाते, ज्यांना पर्याय दिला जातो की आयकर भरा २२ टक्के. परंतु त्यांना जाचक अटी घातल्या आहेत याचा लाभ घेण्यासाठी.
३) तिसरा खेळणारा वयस्कर परंतु थकलेले म्हणजे जुने कंपनी करदाते, ज्यांना आयकर ३३ टक्के भरावा लागेल. कारण नवीन अटी त्यांना त्रासदायक होत आहेत.
अर्जुन : कृष्णा, नवीन कंपनी करदात्यांना या रास दांडियात प्रवेश करण्यासाठी काय नियम आहेत?
कृष्ण : अर्जुना, या कंपनी रास दांडियात भाग घेण्यासाठी नवीन कंपन्यांना १५ टक्के आयकर भरण्यासाठी खालील नियम पाळावे लागतील :
१) कंपनीची रचना आणि नोंदणी ही १ आॅक्टोबर २0१९ नंतर झाली पाहिजे आणि उत्पादनाला ३१ मार्च २0२३ च्या आधी सुरुवात करावी. ट्रेडिंग, सेवा इत्यादी कंपनींना हे लागू होणार नाही.
२) कंपनीची स्थापना ही जुन्या प्रस्थापित व्यवसायाचे विभाजन करून किंवा पुनर्रचनेतून झालेली नसावी.
३) कंपनीने कोणतीही यंत्रसामग्री जी पूर्वी कोणत्या अपवादांच्या अधीन नाही तिचा वापर करू नये.
४) यापूर्वी हॉटेल किंवा अधिवेशन केंद्र म्हणून वापरली जाणारी इमारत कंपनीने वापरू नये.
अर्जुन : कृष्णा, जुन्या खेळाडूंना नवीन कंपनी आयकर दांडिया खेळण्याचे असल्यास काय करावे लागेल?
कृष्ण : अर्र्जुना, जुन्या कंपन्यांना या रास दांडियामध्ये २२ टक्के आयकर भरून भाग घेण्यासाठी पुढील अटी आहेत : कलम १0 अअ अंतर्गत वजावट घेता येणार नाही, कलम ३२ (१)(्र्रं) किंवा ३२अ किंवा कलम ३५(२अअ) किंवा २अइ अंतर्गत वजावट घेता येणार नाही, कलम ८0खखअअ सोडून, बाकी कोणत्याही उत्पन्नाची वजावट चॅप्टर अक-अ मध्ये मिळणार नाही, कोणत्याही मागील असेसमेंट वर्षाशी संबंधित तोटा कपात करण्यास किंवा कॅरी फॉरवर्ड करण्यास चालणार नाही, वरील पर्यायाची निवड ही आयकर रिटर्न फायलिंगच्या आधी करावी आणि एकदा ही निवड केल्यावर ती परत काढता येत नाही. काही कंपन्यांना जुना मॅट क्रेडिट घेता येणार नाही.
अर्जुन : कंपनी करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, कंपनी करदात्यांनी काळजीपूर्वक हा आयकराचा रास दांडिया खेळावा. जसे दांडिया खेळताना हाताला इजा होऊ शकते. तसेच कायदा हातात चुकीने घेतल्यास आर्थिक इजा होऊ शकते. अर्थव्यवस्थेत गती आणण्यासाठी सरकारने या कंपनी आयकर रास दांडियाद्वारे नवीन नियोजन केले आहे.

Web Title: New taxpayer news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.