नवी दिल्ली : पाकिस्तान, चीन आणि इजिप्त आदी देशांतून आयात करण्यात येणाऱ्या १0 हजार टन कांद्यासाठी नाफेडने नवी निविदा जारी केली आहे. या आधी जारी करण्यात आलेल्या निविदेत पुरवठादार देशांना आकर्षित करण्यात नाफेडला अपयश आले होते.मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे कांद्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. राजधानी दिल्लीत कांदा ६0 रुपये किलो विकला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला असून त्याची जबाबदारी नाफेडकडे देण्यात आली आहे.
सिराज हुसैन म्हणाले की, आयात करण्यात आलेला कांदा बाजारात उतरविल्यानंतर पुरवठ्यात सुधारणा होईल. वाढलेल्या किमतीवर नियंत्रण मिळविणे त्यामुळे शक्य होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कांदा आयातीसाठी नवी निविदा जारी
पाकिस्तान, चीन आणि इजिप्त आदी देशांतून आयात करण्यात येणाऱ्या १0 हजार टन कांद्यासाठी नाफेडने नवी निविदा जारी केली आहे
By admin | Published: August 17, 2015 11:20 PM2015-08-17T23:20:14+5:302015-08-17T23:20:14+5:30