लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२४ हे वर्ष सुरू होताच टेक कंपन्यांमध्ये सुरू झालेली कर्मचारी कपात अजूनही थांबताना दिसत नाही. जानेवारी महिन्यात तब्बल ३२ हजार जणांना घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मात्र वेगाने भरती सुरू आहे. कोरोना महामारीपासून उद्योगक्षेत्रात होणाऱ्या कर्मचारी कपातीवर लेऑफ.एफवायआय ही स्टार्टअप नजर ठेवून आहे.
चालू वर्ष संकटांनी भरलेले असून टेक कर्मचाऱ्यांना कपातीच्या संकटाला तोंड लागणार आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. लेऑफ.एफवायआयचे संस्थापक रोजर ली यांनी म्हटले आहे की, खर्चाचा ताण वाढल्याने टेक कंपन्या सध्या कर्मचारी कपात करताना दिसत आहेत. या वर्षात ही कपात सुरुच राहणार आहे. असे असले तरी एआयशी संबंधित कंपन्या सध्या वेगाने वाढताना दिसत आहेत. अनेक कंपन्यांनी एआयवरील खर्चात वाढ केली आहे. (वृत्तसंस्था)
कुठे, किती कपात?
nसोमवारीच ‘स्नॅप इंक’ कंपनीने १० टक्के म्हणजेच ५४० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय जाहीर केला.
nयाआधी ‘ऑक्टा इंक’नेही ७ टक्के म्हणजेच ४०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.
nॲमेझॉन, सेल्सफोर्स, मेटासारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली.
मात्र, एआयने तारले
‘कॉम्प टीआयए’ फर्मने जारी केलेल्या अहवालानुसार डिसेंबर ते जानेवारी या कालखंडात एआय श्रेणीत १७,४७९ नोकऱ्या निर्माण झाल्या. कंपन्यांनी विद्यमान कर्मचाऱ्यांना एआयमध्ये सामावून घेतले आहे.