अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, एप्रिल २0१६ पासून व्हॅटच्या रीटर्नसमध्ये खूप बदल शासनाने आणले आहेत म्हणे! आता खरेदी व विक्री यांची बिलनिहाय माहिती द्यावी लागणार आहे, तर या रीटर्नस्ची कार्यप्रणाली कशी राहील व त्याचे परिणाम काय होतील? कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, एप्रिलपासून आपण आयपीएल २0-२0 चे चुरस सामने पाहत आहोत. तसेच करदात्याची व विभागाची कार्यप्रणाली आतापर्यंत क्रिकेटच्या ‘टेस्ट’ मॅचसारखी होती; परंतु आता नवीन व्हॅटप्रणालीमुळे आयपीएल २0-२0 सारख्या मॅचसारखी सुपरफास्ट होणार आहे. कारण यापूर्वी विक्री कर विभागाचे रीटर्नस् वर्ष ते वर्ष (टेस्ट मॅचसारखे) तपासले जात होते, नंतर टीन टु टीन नंबर अनुसार (वन-डेसारखे) तपासले जात होते व आता बिल टु बिलनुसार (२0-२0 मॅचसारखे) तपासले जाईल. प्रत्येक बिलाला कोडवाईज् माहिती द्यावी लागेल. जसे २0-२0 मॅचमध्ये प्रत्येक बॉल खेळलाच पाहिजे तसेच प्रत्येक बिलाची माहिती दिली पाहिजे. त्यामुळे करदात्याला त्यांच्या इनिंगमध्ये खरेदी - विक्रीची सखोल माहिती रीटर्न दाखल करताना द्यावी लागेल. त्यासाठी करदात्याला हिशोबाची पुस्तके सतत अद्ययावत ठेवावी लागतील. विक्रीकर विभाग प्रत्युत्तर देताना करदात्याचा सेट आॅफ इन पुट टॅक्स क्रेडिट रिपोर्टच्या आधारे अॅटोमॅटेकली डिसअलॉव करील. याआधी असेसमेट किंवा सीडीए नोटीसद्वारे हे होत असे. करदाता व विभाग यांच्यातील हे सामने आता नियमित चालू राहतील.
अर्जुन : कृष्णा, या नवीन मॅचमधील करदात्याला माहीत असावेत, असे मुख्य नियम व अटी कोणत्या?
कृष्ण : अर्जुना, करदात्यांना माहीत असावेत असे मुख्य नियम व अटी खालीलप्रमाणे-
१) यापूर्वी करदात्याला व्हॅट, सीएसटी, जे-१ व जे-२ अनेक्चर असे फॉर्मस् भरून ते विभागाच्या साईटवर वेगवेगळे दाखल करावे लागत होते; परंतु आता एका युटिलिटीमध्ये सर्व एकत्र करण्यात आले आहे.
२) आतापर्यंत दाखल करीत असलेल्या रीटर्नचे प्रकार म्हणजेच फॉर्म नंबर २३१, २३२ इ. यामध्ये बदल केलेला नाही.
३) या युटिलिटीमध्ये खरेदी व विक्रीचे अनेक्चर दिलेले आहे. यामध्ये खरेदी व विक्रीची माहिती भरून व्हॅलिडेट केल्यानंतर रीटर्नचा फॉर्म माहितीच्या आधारे अॅटोमॅटिकली भरला जातो, तो आपण तपासू शकतो. नंतर रीटर्नमध्ये मॅन्युअली काही माहिती भरावी लागेल.
४) ही फाईल विभागाच्या वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर ड्राप्ट रीटर्न बनेल, जर ड्राप्ट रीटर्नमधील माहिती मान्य असेल तर दाखल करावे (आयकरातील टॅक्स आॅडिट रिपोर्टसारखे) व नंतर करभरणा करावा व त्यानंतर अॅकनॉलेजमेट (पोच पावती) जनरेट होईल.
५) करदात्याला ही युटिलिटी विभागाच्या ६६६.ेंँं५ं३.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर मिळेल.
६) रीटर्न योग्य व पूर्ण दाखल करण्याची जबाबदारी करदात्याचीच राहील.
७) जर ड्राप्ट रीटर्न मान्य नसेल तर, करदाता त्यामध्ये बदल करू शकतो किंवा मॅन्युअली माहिती नमूद करू शकतो.
८) प्रत्येक करदात्याला खरेदी व विक्रीचे अनेक्श्चर भरावे लागेल. फक्त कंपोझिशनमध्ये असणाऱ्या करदात्याने विक्रीचे अनेक्चर भरू नये.
९) नील टिर्न असणाऱ्या करदात्यालासुद्धा खरेदी व विक्रीचे रीटर्न दाखल करावे लागेल.
१0) अनेक करदाते प्रिंटिंग स्टेशनरी, रिपेअर्स, स्टाफ वेल्वेअर इ. व्यवहार रीटर्नमध्ये दाखवीत नाहीत; परंतु करदाते असे सर्व व्यवहार या नवीन युटिलिटीमध्ये नमूद करतील, अशी अपेक्षा आहे.
११) अनेक्श्चर किंवा रीटर्नमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू नमूद करता येणार नाही.
१२) जर करदात्याचे दिवसभरात शेकडो व्यवहार होत असतील व खरेदीदाराचे नाव माहीत नसेल तर अॅग्रीगेट बेसिसवर विक्री नमूद करता येईल.
अर्जुन : कृष्णा, या नवीन प्रणालीचे करदात्यावर काय परिणाम होतील?
कृष्ण : अर्जुना, या नवीन प्रणालीचे मुख्य परिणाम खालील प्रमाणे-
१) करदात्याला खरेदी अनेक्श्चरमध्ये दाखविल्याप्रमाणे सेट आॅफ मिळेल; परंतु पुढील महिन्यामध्ये जर करदात्याची खरेदी व समोरच्या व्यक्तीने रीटर्नमध्ये दाखवलेली विक्री यामध्ये फरक आढळल्यास सेट आॅफ अॅटोमॅटिकली डिसअलॉव होईल.
२) सेट आॅफ डिसअलॉव होऊ नये यासाठी करदाता ‘इनपुट टॅक्स क्रेडिट रीपोर्ट’ बिलवाईज मिळतो तो तपासून दुरुस्ती करू शकतो किंवा करवून घेऊ शकतो.
३) सेल्स रीटर्नसाठी वरीलप्रमाणे समोरच्याची पुष्टी लागेल; अन्यथा पुढील रीटर्नमध्ये व्हॅटची रक्कम रिव्हर्स होईल.
४) पर्चेस रीटर्नसाठी विक्री करणाऱ्याच्या पुष्टीची गरज नाही.
५) व्हॅटमधील डिक्लरेशन फॉर्मस् म्हणजेच सी फॉर्म, एफ फॉर्म इत्यादी रीटर्नच्या आधारे दिले जातील.
६) वर्क्स कॉन्ट्रॅक्टमधील टीडीएसचे क्रेडिट समोरच्या डिलरने रीटर्न दाखल केल्यानंतर अकाऊंटमध्ये मिळेल. (लेखक हे चार्टर्ड अकाऊटंट आहेत.)
> अर्जुन : कृष्णा, या नवीन बदलातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, आजचे जीवन हे फास्ट व तांत्रिक झाले आहे. प्रत्येकाला सर्व गोष्टी लवकरात लवकर हातात हव्या असतात. आतापर्यंत कर कायद्यात व्हॅटचे रीटर्न हे दोन-तीन वर्षांनंतर तपासले जायचे व त्यानंतर कार्यवाही होत असे. आता नवीन बदलामुळे मुख्य अनेक परिणाम लवकर होतील. त्यामुळे करबुडवे पकडले जातील व योग्य व्यक्तीसोबत व्यवहाराचे प्रमाण वाढेल. त्याचबरोबर करदात्याला यापुढे व्यवसायातील व्यवहार सतर्कतेने करावे लागतील. यासाठी करदात्याला टॅली सॉफ्टवेअरमध्ये खूप बदल करावे लागतील. तसेच ‘आयपीएल’सारखे सुपरफास्ट निर्णय घ्यावे लागतील; परंतु रीटर्न दाखल करावयाचे हे नवीन नियम करदात्यापर्यंत पोहोचले की नाही व त्याची अंमलबजावणी कशी होईल हे देव जाणे!
नवीन व्हॅट रीटर्नप्रणाली आयपीएलसारखी सुपरफास्ट झाली
कृष्णा, एप्रिल २0१६ पासून व्हॅटच्या रीटर्नसमध्ये खूप बदल शासनाने आणले आहेत म्हणे! आता खरेदी व विक्री यांची बिलनिहाय माहिती द्यावी लागणार आहे
By admin | Published: April 25, 2016 04:09 AM2016-04-25T04:09:11+5:302016-04-25T04:09:11+5:30