Lokmat Money > बिझनेस न्यूज > नवीन व्हॅट करदात्यांनो, द्या ‘लक्ष’, सुरुवातीपासूनच राहा ‘दक्ष’!

नवीन व्हॅट करदात्यांनो, द्या ‘लक्ष’, सुरुवातीपासूनच राहा ‘दक्ष’!

कृष्णा, विक्रीकर विभागाने सध्या नवीन सॅप प्रणाली आणि इतर बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. आता १ मे २०१६पासून नवीन व्हॅट नोंदणी करण्याच्या फॉर्म

By admin | Published: May 9, 2016 03:01 AM2016-05-09T03:01:49+5:302016-05-09T03:01:49+5:30

कृष्णा, विक्रीकर विभागाने सध्या नवीन सॅप प्रणाली आणि इतर बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. आता १ मे २०१६पासून नवीन व्हॅट नोंदणी करण्याच्या फॉर्म

New VAT taxpayers, pay 'attention', stay 'from the beginning'! | नवीन व्हॅट करदात्यांनो, द्या ‘लक्ष’, सुरुवातीपासूनच राहा ‘दक्ष’!

नवीन व्हॅट करदात्यांनो, द्या ‘लक्ष’, सुरुवातीपासूनच राहा ‘दक्ष’!

- ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, विक्रीकर विभागाने सध्या नवीन सॅप प्रणाली आणि इतर बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. आता १ मे २०१६पासून नवीन व्हॅट नोंदणी करण्याच्या फॉर्म १०१मध्ये बदल करण्यात आला आहे. ते बदल काय आहेत. या अनुशंगे नवीन करदात्यांनी काय दक्षता घ्यावी?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, बरोबर विचारलेस, जसे सध्या उन्हाचा पारा वाढत आहे तसेच व्हॅट कायद्यामध्ये या बदलांमुळे कामाचा व्याप (पारा) वाढत आहे. याआधी शासनाने व्हॅट रीटर्न दाखल करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला व त्यात बिल अनुसार सखोल माहिती व्यापाऱ्यांकडून प्रत्येक रीटर्नमध्ये मागितली आहे. आता व्हॅट नोंदणी करण्याच्या फॉर्ममध्ये सखोल माहिती प्रत्येक नवीन व्यापाऱ्याला द्यावी लागणार आहे. म्हणजेच सुरुवातीपासून व्हॅटची वाट अवघड झाली आहे.
अर्जुन : कृष्णा, या नवीन फॉर्ममधील मुख्य बदल कोणते?
कृष्ण : अर्जुना, या नवीन ई १०१ फॉर्ममध्ये मुख्यत: खालीलप्रमाणे जास्तीची माहिती वेबसाईटवर नोंदणी करताना विचारण्यात आली आहे. जसे-
१) ज्या व्यापाऱ्याची खालीलपैकी ज्या कायद्यामध्ये नोंदणी असेल त्या कायद्याअंतर्गत नोंदणीचा नंबर आता द्यावा लागेल. जसे- १) सेंट्रल एक्साईज, २) सर्व्हिस टॅक्स, ३) आयात-निर्यात कोड, ४) कंपनी नोंदणी नंबर (सी आय एन), ५) सीएसटी, ६) पीटीआरसी, ७) पीटीईसी, ८) स्टेट एक्साईज नंबर.
२) व्यापाऱ्याच्या व्यवसायाच्या जागेच्या वीज बिलाची सखोल माहिती. जसे- ज्यांच्या नावावर मीटर आहे, ग्राहक नंबर, अकाउंट नंबर, बिलिंग युनिट, तालुका, वर्ष इत्यादी माहिती द्यावी लागेल. वीज बिलातील पत्ता व नोंदणी पत्त्यात फरक आढळल्यास सुधारणा द्यावी लागेल.
३) याअगोदर व्यवसायाचे १० प्रकारचे पर्याय होते उदा. मॅन्युफॅक्चर, रिटेलर इ. आता यासाठी ५६ पर्याय दिले आहेत. यामधील जो लागू होईल ते पर्याय घ्यावा लागेल.
४) ज्यांना तात्पुरते रजिस्ट्रेशन घ्यावयाचे असेल उदा. फन फेअरचे स्टॉल, प्रदर्शनी इत्यादीसाठी त्याचा कालावधी नमूद करावा लागेल.
५) जेथे व्यवसाय आहे त्या क्षेत्राचे विक्रीकर अधिकाऱ्याचे लोकेशन / वॉर्डवाईज द्यावे लागेल.
६) रजिस्ट्रेशन करण्यासाठी यापूर्वी ५ कारणांपैकी एक कारण निवडावे लागत होते. आता यामध्ये ३ पर्याय वाढवून दिले आहेत. १) मर्जर/ अमल्गमेशन, २) डिमर्जर, ३) मालकाच्या मृत्यूमुळे व्यवसायाचे पूर्ण हस्तांतरण.
७) याआधी व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेण्यासाठी दुसऱ्या नोंदणीकृत डिलर (इन्ट्रोड्युसर)ची माहिती द्यावी लागायची, आता ती लागणार नाही. तसेच अधिकृत सीए अथवा एसटीपीची माहिती द्यावी लागेल.
८) जर व्यापाऱ्याची वेबसाईट असेल तर त्याची माहिती द्यावी लागेल.
९) याअगोदर फक्त एका बँक अकाउंटची माहिती आवश्यक होती; परंतु आता व्यापाऱ्यास सर्व बँक अकाउंट्सची माहिती द्यावी लागणार आहे. अनेक व्यापारी एकाच बँक अकाउंटची माहिती देऊन पळवाटा काढत होते. ते थांबविण्यासाठी ही तरतूद आणली आहे.
१०) यापूर्वी मुख्य खरेदी व विक्रीच्या वस्तूची माहिती शेड्युल एंट्री व एचएसएन कोडप्रमाणे द्यावी लागत होती; परंतु आता शेड्युल एंट्रीमध्ये, एंट्री नंबर, सब एंट्री नंबर तसेच एचएसएन कोडचे हेडिंग, सब हेडिंग व टॅरीफ आयटम नंबर द्यावे लागणार आहे.
११) तसेच मुख्य वस्तूच्या शिवाय आता इतर खरेदी व विक्रीच्या वस्तूंची माहिती द्यावी लागेल.
१२) सर्व अ‍ॅडीशनल प्लेस आॅफ बिझनेस व तेथील वीज बिलाची माहिती आता द्यावी लागणार आहे.
१३) अ‍ॅडीशनल प्लेस आॅफ बिझनेससाठी तेथे काय व्यवसाय आहे हेसुद्धा नमूद करावे लागेल.
१४) व्यापाऱ्याचा परराज्यात व्यवसाय असेल तर त्याचा त्या राज्यातील टीन नं. द्यावा लागेल.
१५) सर्व भागीदार, डायरेक्टरर्स यांची जन्मतारीख, पासपोर्ट नंबर, डायरेक्टर आयडेंटीफीकेशन नंबर, मोबाइल नंबर, आधार कार्ड नंबर, लिंग, इमेल आय डी नमूद करावा लागेल.
नोंदणी करताना फॉर्ममध्ये चूक झाल्यास ३० दिवसांत सुधारावी लागेल. महाव्हॅटच्या नवीन संगणकीकरणामुळे नवीन करदात्याला ई-मेल आणि मोबाइलवर सर्व माहिती मिळेल.
अर्जुन : कृष्णा, नवीन करदात्यांनी याव्यतिरिक्त अजून काय दक्षता घ्यावी?
कृष्ण : अर्जुना, १ एप्रिल २०१६पासून नवीन करदात्यांनी सुरुवातीपासूनच खालील मुद्द्यांची दक्षता घ्यावी-
१) नोंदणी केलेल्या पहिल्या वर्षात दर महिन्याला रीटर्न भरावे लागतील.
२) खरेदी आणि विक्रीची बिले पहिल्या दिवसापासूनच मेंटेन करावी लागतील.
३) खरेदीदार आणि विक्रीदार यांनी टिन नंबर बिलावर नमूद करणे आवश्यक आहे.
४) ६६६.ेंँं५ं३.ॅङ्म५.्रल्ल वर इनपुट टॅक्स क्रेडिट, सीएसटी फॉर्मस् इत्यादीची माहिती तपासता येईल.
५) लहान करदात्यांना बिलिंग सॉॅफ्टवेअरसुद्धा विक्रीकर विभागातर्फे उपलब्ध आहे.
अर्जुन : कृष्णा, या व्हॅटच्या नवीन करदात्यांनी काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, शासन आता प्रत्येक गोष्टीची व्यापाऱ्याकडून सखोल माहिती घेत आहे. अनेक व्यापारी कायद्याच्या पळवाटा काढत होते, आता त्याला आळा घालण्यासाठी शासनाने हे बदल आणले आहेत. हे नवीन बदल चांगल्या हेतूने करण्यात येतात.
परंतु चांगल्या व्यापाऱ्यांना याचा त्रास होऊ नये हीच अपेक्षा. या सर्व माहितीचा उपयोग शासनाने करचुकविणाऱ्या व्यापाऱ्यास पकडण्यास योग्य रीतीने केला पाहिजे. जसे शाळेत नवीन विद्यार्थ्यास पहिल्या दिवसापासूनच समोरच्या रांगेत बसवल्यास तो पुढे भविष्यात शिस्तीत राहतो; तसे नवीन करदाते पहिल्यापासूनच शिस्तीत राहावेत हाच विक्रीकर विभागाचा हेतू आहे.

Web Title: New VAT taxpayers, pay 'attention', stay 'from the beginning'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.