नवी दिल्ली- घर खरेदीदारांसाठी केंद्र सरकारनं मोठी आनंदवार्ता दिली आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयानं मध्यम वर्गीयां(एमआयजी)साठी क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजने(सीएलएसएस)चा कालावधी आणखी 12 महिन्यांसाठी वाढवला असून, आपल्याला 31 मार्च 2020पर्यंत या योजनाचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, एमआयजी योजनेत सीएलएसएसनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आता या योजनेची मुदत वाढवल्यामुळे 2019च्या शेवटच्या महिन्यापर्यंत लाभार्थ्यांची संख्या 1 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 डिसेंबर 2016ला देशाला संबोधित करताना या योजनेची घोषणा केली होती. तरुण व्यावसायिक आणि मध्यम वर्गीय उद्योगपतींची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दृष्टीनंच एमआयजीमध्ये नव्या सीएलएसएसला सुरुवात करण्यात आली होती.
- या योजनेत मिळतात हे फायदे- या योजनेंतर्गत अत्यल्प आणि मध्यम वर्गीय लोकांना घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जावरील व्याजदरावर तीन ते 6.5 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. सबसिडीची रक्कम तेट बँक खात्यात वळते केले जातात. पुरी म्हणाले, पीएमएवाय, मेट्रो रेल, स्मार्ट सिटी आणि स्वच्छता अभियानात 2018मध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे.
- जानेवारी 2017मध्ये झाली होती सुरुवात- एमआयजीसाठी सीएलएसएस ही योजना 31 डिसेंबर 2017 रोजी सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत घर खरेदी करण्यासाठी बँक, होम लोन कंपनी आणि इतर कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्या एमआयजीच्या लाभार्थ्यांचा समावेश केलेला आहे.
- कारपेट एरिया होता वाढवला- नोव्हेंबर 2017मध्ये या योजनेच्या सुरुवातीला एमआयजी-I आणि एमआयजी-IIसाठी फ्लॅटचा कारपेट एरिया क्रमशः ‘120 वर्ग मीटरपासून 150 वर्ग मीटरपर्यंत ठेवण्यात आला होता. जून 2018मध्ये एमआयजी-I आणि एमआयजी-IIतल्या घरांसाठी कारपेट एरिया वाढवून क्रमशः 160 वर्ग मीटरपासून 200 वर्ग मीटरपर्यंत ठेवण्यात आला होता.