मुंबई : प्रत्येक नववर्ष हे संकल्पाचे असते. नवीन वर्षात काही ना काही संकल्प सोडला जातो. त्यात डिसेंबर हा थंडीचा महिना असल्याने व सध्याचा काळ ‘हेल्थ कॉन्शस’चा असल्याने अनेक जण व्यायामाचा संकल्प सोडतात. हा नववर्ष संकल्प स्पोर्ट्स शूजच्या कंपन्यांच्या पथ्यावर पडला आहे. डिसेंबर महिन्यातील शूजच्या विक्रीत १०० टक्के वाढ झाली आहे.ग्राहककेंद्रित किरकोळ बाजारात डिसेंबर महिन्यात वर्षअखेर विशेष सेल असतो. यंदा असा सेल आॅनलाइन पोर्टलवरही होता. या सेलमध्ये स्पोटर््स शूजची विक्री करणाºया कंपन्यांचा मोठा समावेश होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील विक्रीत मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण जापनीज फुटवेअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रजत खुराणा यांनी नोंदवले.प्युमा या जगप्रसिद्ध जर्मन कंपनीनुसार, नवीन वर्ष संकल्पात फिटनेसला नागरिकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. यामुळेच एरवी जानेवारीऐवजी यंदा डिसेंबर महिन्यात ठेवलेल्या सेलला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व प्रकारच्या विक्रीत अन्य महिन्यांपेक्षा किमान ३० टक्के वाढ डिसेंबरमध्ये दिसून आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.असेच निरीक्षण बहुतांश कंपन्यांनी नोंदवले. त्यांच्यानुसार, व्यायामाच्या सर्व श्रेणीतील शूजच्या विक्रीत वाढ होती. जीममध्ये व जीमच्या बाहेर अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणाºया शूजना विशेष मागणी असते. ते खरेदी करण्याकडे यंदा ग्राहकांचा कल होता. या बाजाराला आॅनलाइनची मोठी साथ मिळाली. ख्रिसमसच्या आधीपासून नववर्ष सुरू झाल्यानंतर एक आठवड्यापर्यंत सर्वच आॅनलाइन कंपन्यांनी या दोन्ही आठवड्यांत विशेष सेल ठेवला होता. त्या सेलमधील स्पोर्ट्स शू खरेदीवर ग्राहकांनी अक्षरश: उड्या मारल्या.
नववर्षाचा संकल्प शूज कंपन्यांच्या पथ्यावर, विक्री दुप्पट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 3:29 AM