Join us  

House Rent : न्यूयॉर्क सर्वात महाग, तर ढाका सर्वात स्वस्त शहर; जाणून घ्या, दिल्ली-मुंबई कोणत्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 5:42 PM

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका बेडरूम अपार्टमेंटचे महिन्याचे घरभाडे तब्बल 3,789 डॉलर एवढे आहे. भारतीय चलनात बोलायचे झाल्यास 3,14,322 रुपये. या यादीत सिंगापूरचा दुसऱ्या क्रमांक लागतो.

जगातील सर्वात जास्त घरभाडे कुठ्या शहरात आहे, हे आपल्याला माहिती आहे का? तर याचे उत्तर आहे न्यूयॉर्क. हो, अमेरिकेतील या शहरात एका बेडरूम अपार्टमेंटचे महिन्याचे घरभाडे तब्बल 3,789 डॉलर एवढे आहे. भारतीय चलनात बोलायचे झाल्यास 3,14,322 रुपये. या यादीत सिंगापूरचा दुसऱ्या क्रमांक लागतो. या आशियाई देशात, सिटी सेंटरमध्ये एका बेडरूम अपार्टमेंटचे महिन्याचे घरभाडे अथवा रेंट 3,454 डॉलर एवढे आहे. रेंटप्रमाणे जगातील टॉप 10 महागड्या शहरासंदर्भात बोलायचे झाल्यास, यांतील सात शहरे एकट्या अमेरिकेतील आहेत. यात न्यूयॉर्कशिवाय, सॅन फ्रान्सिस्को, ब्रुकलिन, बोस्टन, सॅन डिएगो, मियामी आणि सॅन होजे यांचा समावेश आहे. याशिवया टॉप 10 मध्येय बरमूडाच्या हॅमिल्टन आणि जर्मनीतील ज्यूरिखचा समावेश आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार (World of Statistics) नुसार, जगातील 13 शहरांमध्ये वन बेडरूम अपार्टमेंटचे मासीक भाडे 2,500 डॉलरपेक्षा अधिक आहे. यात जॉर्ज टाऊन, लॉस एंजिलिस आणि लंडनचा समावेश होतो. लंडनच्या सिटी सेंटरमध्ये एक बेडरूम असलेल्या अपार्टमेंटचे मासिक भाडे 2,614 डॉलर एवढे आहे. भारतीय चलनाचा विचार करता, जवळपास 2,16,848 रुपये. हाँगकाँगमध्ये 2,274 डॉलर, डबलिनमध्ये 2,121 डॉलर, सिडनीमध्ये 2,114 डॉलर, दुबईमध्ये 1,976 डॉलर, पॅरिसमध्ये 1,411 डॉलर, टोकियोमध्ये 974 डॉलर आणि शंघायमध्ये 930 डॉलर. 

दिल्ली-मुंबईची स्थिती - भारताचा विचार करता, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक बेडरूम असलेल्या फ्लॅटचे मासिक भाडे 570 डॉलर म्हणजेच 47,285 रुपये एवढे आहे. रेंटचा विचार करता मुंबई हे देशातील सर्वात महागडे शरह आहे. मात्र जगात याचा क्रमांक 351वा आहे. दिल्लीत एक बेडरूम असलेल्या फ्लॅटची किंमत मुंबईच्या तुलनेत अर्धी आहे. दिल्लीत 245 डॉलर म्हणजेच, 20,324 रुपये मासिक घरभाडे आहे. याशिवाय, पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद आणि बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये मासिक घरभाडे सर्वात कमी आहे. इस्लामाबादमध्ये 152 डॉलर तर ढाक्यात 135 डॉलर एवढेच मासिक घर भाडे आहे.

टॅग्स :अमेरिकासुंदर गृहनियोजनअमेरिकामुंबईदिल्ली