Join us

न्यूज कॉर्प 1250 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, सांगितलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:12 AM

News Corp : तज्ज्ञांच्या मते, वाढत्या महागाईमुळे व्यावसायिकांच्या जाहिरातीवरील खर्चात अचानक घट झाली आहे. उच्च व्याजदरामुळे न्यूज कॉर्प सारख्या कंपन्यांच्या रेव्हेन्यू सोर्सेस परिणाम झाल्याचेही सांगितले जात आहे. 

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू आहे. त्यात आता न्यूज कॉर्पचे ( News Corp) नावही जोडले गेले आहे. शुक्रवारी माहिती देताना कंपनीने सांगितले की, न्यूज कॉर्प आपल्या कर्मचार्‍यांमध्ये जवळपास 5 टक्के म्हणजे 1250 जणांची कपात करणार आहे. नफा आणि महसूल कमी होण्याच्या अंदाजानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 

एका अधिकृत निवेदनात, कंपनीने असेही म्हटले आहे की फॉक्स कॉर्पमध्ये विलीन करण्याच्या योजनेवर कंपनीने 6 मिलियन खर्च केले आहेत. जानेवारीमध्ये, न्यूज कॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष आणि फॉक्सचे सह-अध्यक्ष रूपर्ट मर्डोक यांनी योजना रद्द केली होती. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या महागाईमुळे व्यावसायिकांच्या जाहिरातीवरील खर्चात अचानक घट झाली आहे. उच्च व्याजदरामुळे न्यूज कॉर्प सारख्या कंपन्यांच्या रेव्हेन्यू सोर्सेस परिणाम झाल्याचेही सांगितले जात आहे. 

वाढत्या व्याजदर आणि महागाईचा त्याच्या सर्व व्यवसायांवर मूर्त परिणाम झाला आहे. कंपनीचे समभाग जवळपास 3 टक्क्यांनी घसरले आहेत, असे चीफ एक्झिक्युटिव्ह रॉबर्ट थॉमसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. तसेच, थॉमसन पुढे म्हणाले की, मंदीचा सामना करण्यासाठी काही पुढाकार घेतला जात आहे, ज्यात कर्मचारी कपात समावेश आहे. याशिवाय, कंपनीच्या सीईओने सांगितले की, सर्व व्यवसायांमध्ये नोकऱ्यांमध्ये कपात केली जाईल आणि वार्षिक आधारावर कमीत-कमी 130 मिलियन डॉलरची बचत होईल.

तिसऱ्या तिमाहीत कंपनीला फॉक्ससोबतचा करार संपल्यानंतर पैसे परत मिळण्याची अपेक्षा आहे. ज्याच्या कंपनीला मोठा दिलासा मिळू शकतो. दुसऱ्या तिमाहीत जाहिरात महसूल 10.6 टक्क्यांनी घसरून 464 मिलियन डॉलर झाला होता, तर फॉक्सचा जाहिरात रेव्हेन्यू डिसेंबर तिमाहीत वर्ल्ड कप आणि यूएस मिड इलेक्शनमुळे 4 टक्क्यांनी वाढला. Refinitiv च्या डेटानुसार, 31 डिसेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत रेव्हेन्यू 2.52 बिलियन डॉलर होता, तर विश्लेषकांनी सरासरी $2.55 अब्ज अपेक्षित केले होते.

टॅग्स :व्यवसायकर्मचारी