Lokmat Money > बिझनेस न्यूज > डिजिटल युगातही भारतात वृत्तपत्रांचाच दबदबाच, गेल्या ५ वर्षांत प्रथमच देशातील वृत्तपत्रांच्या महसुलात वाढ

डिजिटल युगातही भारतात वृत्तपत्रांचाच दबदबाच, गेल्या ५ वर्षांत प्रथमच देशातील वृत्तपत्रांच्या महसुलात वाढ

  नवी दिल्ली : २०२३ मध्ये मुद्रित माध्यमे विशेषत: वृत्तपत्रांच्या महसुलामध्ये ४ टक्के वाढ झाली. डिजिटल माध्यमांपेक्षा वृत्तपत्रांसाठी ही ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 02:45 PM2024-03-08T14:45:00+5:302024-03-08T14:45:31+5:30

  नवी दिल्ली : २०२३ मध्ये मुद्रित माध्यमे विशेषत: वृत्तपत्रांच्या महसुलामध्ये ४ टक्के वाढ झाली. डिजिटल माध्यमांपेक्षा वृत्तपत्रांसाठी ही ...

Newspapers dominate in India even in the digital age, for the first time in the last 5 years, the revenue of newspapers in the country has increased | डिजिटल युगातही भारतात वृत्तपत्रांचाच दबदबाच, गेल्या ५ वर्षांत प्रथमच देशातील वृत्तपत्रांच्या महसुलात वाढ

डिजिटल युगातही भारतात वृत्तपत्रांचाच दबदबाच, गेल्या ५ वर्षांत प्रथमच देशातील वृत्तपत्रांच्या महसुलात वाढ

 

नवी दिल्ली : २०२३ मध्ये मुद्रित माध्यमे विशेषत: वृत्तपत्रांच्या महसुलामध्ये ४ टक्के वाढ झाली. डिजिटल माध्यमांपेक्षा वृत्तपत्रांसाठी ही अधिक उत्साहवर्धक घटना आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या (फिक्की)या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 

हा महसूल २०२२ या वर्षापेक्षा अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत प्रथमच वृत्तपत्रांना मिळालेल्या जाहिरातींचा महसूल व अन्य महसुलात वाढ झाली आहे.२०२६ पर्यंत वार्षिक ३.४ टक्के दराने वृत्तपत्र व्यवसायाची वाढ होणार आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेत घसरण, भारतात मात्र विस्तार 
भारतातील वृत्तपत्रे अमेरिका, युरोपातील वृत्तपत्रांपेक्षा उत्तम स्थितीत आहेत. भारतात वृत्तपत्रांचे घरोघर वितरण होते. भारतीयांना वृत्तपत्रे वाचण्याची सवय अधिक आहे.

गेल्या दोन दशकांत अमेरिकेत वृत्तपत्रांच्या खपामध्ये घसरण झाली. वृत्तपत्रांचा ५.५ कोटी इतका खप होता तो आता २.३ कोटींवर आला आहे. अमेरिकेत २२०० स्थानिक वृत्तपत्रे बंद झाली.

भारतातील रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्सकडील २०२१-२२च्या खपाची आकडेवारीनुसार वृत्तपत्रांचा खप २२.६ कोटी इतका आहे.

४५ ते ५० टक्के खर्च कागदावरच
टीएएम ॲडेक्सच्या माहितीनुसार, कोरोनाच्या आधी वृत्तपत्रांचा जो महसूल होता त्यापेक्षा आता वाढ झाली आहे. मागील तिमाहीत वृत्तपत्र कागदाच्या किमती प्रतिटन ५०० डॉलरने कमी झाल्या. वृत्तपत्रांची कव्हर प्राईज वाढली होती. त्यामुळे महसुलात वृद्धी झाली. वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ४५ ते ५० टक्के रक्कम कागदावर खर्च होते.

वेबसाइटमधून मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण कमी 
nसहस्त्रकाच्या सुरुवातीला पाश्चिमात्य देशांमध्ये वृत्तपत्रांचा खप कमी होत होता. त्याच काळात भारतामध्ये वृत्तपत्रांचा खप व वाचकसंख्या वाढत होती. 
nत्यातून मिळालेल्या उत्पन्नातून अनेक वृत्तपत्र समूहांना आपली वेबसाईट व अन्य डिजिटल माध्यमे सुरू करण्यासाठी पाठबळ मिळाले होते. 
nडिजिटल माध्यमातून वृत्तपत्रांना फारसा महसूल मिळालेला नाही. भारतात २०२३ साली ऑनलाइन जाहिरातींवर ५७,६०० कोटी खर्च करण्यात आले. 
nत्यातील ८० टक्के भाग हा गुगल (सर्च, यूट्युब), मेटा (व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक) यांच्याकडे वळला होता. वृत्तपत्रांच्या वेबसाईटना अगदीच कमी प्रमाणात जाहिराती मिळाल्या. 

- भारतात वृत्तपत्रांचा खप २२.६ कोटी इतका आहे.
- अमेरिकेत वृत्तपत्रांचा खप २.३ कोटींवर आला आहे. 
 

Web Title: Newspapers dominate in India even in the digital age, for the first time in the last 5 years, the revenue of newspapers in the country has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.