Join us  

'न्यूजरीच'ने स्टार्टअप स्टेअर्सचा उपक्रम असलेल्या ’ग्रोव्थ ऍक्सलरेशन प्रोग्राम विथ ४आय’ अंतर्गत उभारला निधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 9:13 PM

अत्यंत स्थानिक पातळीवरील वृत्ते प्रकाशझोतात आणण्यास होते मदत

अहमदाबाद स्थित न्यूजरीच या डिजिटल मीडिया टेक स्टार्टअपने आपल्या वाटचालीत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. स्टार्टअप स्टेअर्सचा उपक्रम असलेल्या ’ग्रोव्थ ऍक्सलरेशन प्रोग्राम विथ ४आय’च्या टॉप १५ विजेत्यांमध्ये न्यूजरीचची निवड झाली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, न्यूजरीचला १ कोटी सीड फंडिंग पुरस्कार म्हणून देण्यात आले. न्यूजरीच हे कंटेंट निर्मिती, परवाना आणि वितरण यामध्ये कार्यरत आहे. या कंपनीने भारतातील पहिल्या स्थानिक वृत्त समुदायाची स्थापनादेखील केली आहे. यामुळे अत्यंत स्थानिक पातळीवरील वृत्ते प्रकाशझोतात आणण्यास मदत होते.

स्टार्टअप स्टेअर्स एकप्रकारचे एक्सलरेटर आहे, ज्यामुळे चांगले स्टार्टअप्स, एमएसएमई आणि महत्वाकांक्षा असणार्‍या नव-उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी गती प्रदान करण्यास मार्गदर्शन सेवा प्रदान करुन त्यांना सक्षम बनवण्यात येते. स्टार्टअपने अलीकडेच स्टार्टअप इंडियाच्या सहाय्याने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट (एनएसडीसी) च्या नेतृत्वाखाली ’ग्रोव्थ ऍक्सलरेशन प्रोग्राम विथ ४आय’ चे आयोजन केले होते व आता त्यांनी विजेत्यांच्या नावाची घोषणा देखील केली आहे. प्रतिष्ठित परीक्षकांनी १५ आघाडीच्या कंपन्यांची निवड केली आहे, ज्यांना प्रत्येकी २५ लाख ते ५ कोटी रुपयांची सीड फंडिंग प्रदान करण्यात आले.

सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे भारताचे स्टार्टअप क्षेत्र देशातील आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी अधिकाधिक आकर्षणाचा विषय होत आहे. गोव्थ ऍक्सलेटर्स आणि इन्क्युबेटर्स व्यवसाय वाढीसाठी उत्प्रेरक म्हणून अनमोल ठरले आहेत, जे तज्ञांच्या सल्ल्याने आणि विस्तृत नेटवर्कद्वारे स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात अतिशय वेगाने वृद्धिंगत होण्यास मदत कातात. नॅसकॉम आणि झिनोव्ह च्या अहवालानुसार, या स्टार्टअप्समध्ये ६ वर्षांच्या कालावधीत ’२०१४ मध्ये ७,००० ते २०२० मध्ये ५०,०००’ एवढी प्रचंड वाढ झाली आहे. तंत्रज्ञान, मीडिया आणि ई-कॉमर्स ते आरोग्यसेवेच्या माध्यमातून वित्तापर्यंत; प्रामुख्याने इतर प्रोत्साहन तर मिळतेच त्याचबरोबर उद्दम भांडवलाची सुलभता देखील वाढली आहे, यामुळे उद्योजक भारताच्या भविष्यातील यशामध्ये आपला मार्ग मोकळा करत आहेत. स्टार्टअप स्टेअर्स सारखे कार्यक्रम म्हणजे मौल्यवान संसाधने आहेत, जी उद्योजकांना कार्यप्रदर्शन-संचालित वातावरणात अनेक वर्षांच्या अनुवभाने प्राप्त झालेले ज्ञान देऊन त्यांना सक्षम बनवते.

स्टार्टअप स्टेअर्सचे संचालक प्रीत साधू यांनी स्टार्टअप इकोसिस्टीमची एक अशी कल्पना मांडली आहे, ज्यामध्ये संभाव्य जोखमीचा सामना करण्यासाठी आणि ब्रॅंडची अविरतता (ब्रॅंडची अखंडता) निर्माण करण्यासाठी आधार-लिंक्ड डिजिटल व्हेरिफिकेशन समाविष्ट केले आहे. या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेत अधिक विश्वासार्हतेसह मोठ्या प्रमाणात झेप घेता येईल. 

न्यूजरीचला खासदार तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे नाविन्यपूर्ण स्टार्टअप त्यांच्या प्रगत ३६०-डिग्री टेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंटेंट मार्केटिंगमध्ये क्रांती घडवत आहे. 

न्यूजरीचचे सह-संस्थापक आणि सीईओ दर्शन शाह म्हणाले, "सध्या जाहिरात क्षेत्र हे उद्योगातील दिग्गज मानल्या जाणार्‍या गुगल, फेसबुक यांनी प्रदान केलेल्या सर्च आणि डिस्प्ले जाहिरातींवर पूर्णपणे विसंबूत आहे, यामुळे मर्यादित एंगेजमेंट आणि आरओआय प्राप्त होते. २ शहर ते त्यापुढील ५००मि+ वापकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही ब्रॅंडकडे दुसरा चांगला उपाय नाही. आमच्या टेक प्लॅटफॉर्ममुळे ब्रॅंड्सना स्थानिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरातीचा एक प्रकार म्हणून ऍडव्हर्टोरियल आणि स्पाउंसर्ड कंटेंटच्या माध्यमातून ही संधी प्रदान केली जाते. आम्हाला स्टार्टअप स्टेअर्सकडून मिळालेल्या निधीमुळे न्यूजरीचची सध्याची निधीसंबंधीची आवश्यकता पूर्ण झाली आहे.

टॅग्स :व्यवसायअहमदाबाद