Multibagger Penny Stock : गेल्या आठवड्यात अनेक जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. त्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि फेड रिझर्व्हची धोरणात्मक बैठक ही प्रमुख होती. दरम्यान, आज नवीन ट्रेडिंग वीक सुरू झाला असून बाजारात पुन्हा एकदा चढ-उतारच दिसून येत आहे. दरम्यान, स्मॉलकॅप कंपनी व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेडच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे.
सोमवारी व्हीसीयू डेटा मॅनेजमेंटचा शेअर २० टक्क्यांनी वधारून १०.५१ रुपयांवर पोहोचला. गेल्या अनेक दिवसांपासून या शेअरमध्ये वाढ नोंदवली जात आहे. गेल्या ६ दिवसात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास ६० टक्के परतावा दिलाय. तर, गुंतवणूकदारांना ६ महिन्यांच्या कालावधीत शेअरनं ४५ टक्के परतावा दिलाय.
व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेडचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२.९८ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५.१६ रुपये आहे. कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल बोलायचं झालं तर ते १६.२९ कोटी रुपये आहे. स्टॉक प्रॉफिट टू अर्निंग (पी/ई) रेश्यो ४३२.३३ असून तो खूप जास्त आहे.
बुक व्हॅल्यू दुप्पट
व्हीसीयू डेटा मॅनेजमेंटच्या शेअर्समध्ये कमाईचं सत्र नुकतंच सुरू झालं असून कंपनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. कंपनी आपले फंडामेंटल्स अधित मजबूत करण्यात गुंतलेली आहे. या शेअरची बुक व्हॅल्यू सध्याच्या शेअरच्या किमतीच्या दुप्पट आहे. याची बुक व्हॅल्यू १९.३० रुपये आहे. म्हणजेच कंपनीकडे भरपूर मालमत्ता आहे.
या व्यवसायात आहे कंपनी
कंपनी हाय क्वालिटी आणि कमी बँडविड्थवर इंटरॅक्टिव्ह ऑडिओ / व्हिडिओ लाइव्ह स्ट्रीमिंग हार्डवेअर / सॉफ्टवेअर कॉम्बिनेशन सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनी एचडी व्हिडीओ कम्युनिकेशनसाठी व्हिडीओ एन्कोडर, मीडिया सर्व्हर, डिकोडर आणि २जी / ३जी / ४जी / वायफाय आणि बँडविड्थ इंटिग्रेशन तंत्रज्ञान प्रदान करते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)