Join us

सप्टेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीचा पुढचा गीअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 6:18 AM

शुभ वर्तमान : निर्बंध शिथिल होत असल्याने उत्पादक सुखावले

नवी दिल्ली : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणेमुळे सप्टेंबर महिन्यात वाहन उद्योगाच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागले आहे. या महिन्यात बहुतांश वाहन उत्पादक कंपन्यांची विक्री चांगलीच वाढलेली दिसून येत आहे. ही विक्री जवळपास कोरोनापूर्व स्थितीत पोहोचली आहे.लॉकडाऊन शिथिल झाल्याने पुरवठ्यात झालेली सुधारणा आणि ग्रामीण व निमशहरी बाजारातील वाढलेली मागणी यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीत वाढ झाली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या भीतीमुळे सार्वजनिक वाहनांऐवजी स्वत:च्या वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. त्याचाही लाभ वाहनविक्रीला झाला आहे.

सप्टेंबरमध्ये मारुती सुझुकीच्या एकूण वाहन विक्रीत वार्षिक आधारावर ३० टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये ह्युंदाई मोटर्सची विक्री ३.८ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीची देशांतर्गत विक्री तब्बल २३.६ टक्क्यांनी वाढली आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राची वाहन विक्री मात्र १७ टक्क्यांनी घसरली आहे. एम अ‍ॅण्ड एमचे नुकसान कृषी वाहनांनी भरून काढले आहे. कंपनीच्या कृषी वाहनांची विक्री १७ टक्क्यांनी वाढली आहे. दुचाकींमध्ये हीरो मोटोकॉर्पची वाहन विक्री १६.९ टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबरमधील विक्री ही कंपनीची २०२० मधील सर्वाधिक आहे. बजाज आॅटोच्या एकूण वाहन विक्रीत १० टक्क्यांची वाढ झाली. आहे. देशांतर्गत विक्रीत ६ टक्के, तर निर्यातीत १४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या चाकणमधील प्रकल्पातून सर्वाधिक निर्यात झाली आहे. याशिवाय टीव्हीएसच्या विक्रीमध्ये ४.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशोक लेलॅण्ड या कंपनीला मात्र फटका बसला आहे.ही आहेत वाढीची कारणेच्सुरक्षिततेसाठी स्वत:चे वाहन वापरणे.च्चांगल्या पावसामुळे आलेले चांगले पीक.च्६ महिन्यांपासून थांबून राहिलेले ग्राहक. 

टॅग्स :व्यवसायबाईक