Join us

पुढच्या आठवड्यात मिळेल स्वस्तात सोने खरेदीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 6:15 AM

या राेख्यांची खरेदी करून नफाही कमावता येऊ शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारत सरकारची सॉव्हरिन गोल्ड बाँडची म्हणजे सुवर्ण रोख्यांची मालिका-४ येत्या १२ फेब्रुवारी रोजी खुली हाेणार आहे. या योजनेत नागरिकांना स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी मिळू शकते. सरकार सॉव्हरिन गोल्ड बाँड मालिकेत अधूनमधून रोख्यांची विक्री करीत असते. हे रोखे गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय समजले जातात. या राेख्यांची खरेदी करून नफाही कमावता येऊ शकतो.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना २.५ टक्के व्याज मिळते. एसजीबीमध्ये सोन्याच्या शुद्धतेच्या बाबतीत कोणताही धोका नसतो. प्रत्यक्ष बाजारातील सोने खरेदीत शुद्धतेबाबत नेहमीच धोका असू शकतो. मिळालेले सोने कमी शुद्धतेचेही असू शकते. 

कसे घेणार सुवर्ण रोखे?nयासाठी सर्वप्रथम आपल्या नेट बँकिंग खात्यावर लॉग इन करा. मेन मेन्यूमधून ‘ई-सर्व्हिस’ पर्याय निवडा. nसॉव्हरिन गोल्ड बाँडवर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा. डिपॉजिटरी पार्टिसिपेंटसाठी एनएसडीएल अथवा सीडीएसलवरील तपशील वाचा.nनोंदणी अर्ज भरल्यानंतर ‘खरेदी’ टॅबवर क्लिक करा. सब्स्क्रिप्शनचे प्रमाण आणि नॉमिनी तपशील भरा.nफोनवर आलेला ओटीपी भरा.

टॅग्स :सोनंव्यवसाय