Join us

...तर पुढच्या वर्षी ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 5:52 AM

महाराष्ट्राची २०१९ पर्यंतच ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्था होऊ शकते. पण शाश्वत विकासासाठी हे लक्ष्य २०२५ पर्यंतपूर्ण केले जाईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मुंबई : महाराष्ट्राची २०१९ पर्यंतच ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्था होऊ शकते. पण शाश्वत विकासासाठी हे लक्ष्य २०२५ पर्यंतपूर्ण केले जाईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.द इंडस एन्टरप्रेन्यअर्स (टाय) या संस्थेची दोन दिवसीय जागतिक परिषद बुधवारपासून सुरू झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाची योजना मांडली. राज्यातील उद्योगांचा विकास दर ९.३ टक्के आहे. अशाच वेगाने आपण पुढे गेल्यास कुठलेही विशेष प्रयत्न न करताही राज्याची २०१९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्था होईल. पण तो विकास शाश्वत नसेल. विकास शाश्वत राहण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असेल. त्या प्रयत्नांमधून २०२५ पर्यंतचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस