Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता स्वस्तात करता येणार प्रवास, 'सहकार टॅक्सी' लवकरच होणार सुरू!

आता स्वस्तात करता येणार प्रवास, 'सहकार टॅक्सी' लवकरच होणार सुरू!

NFTC to launch Sahakar Taxi : नॅशनल टूरिझम अँड ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड (NFTC) लवकरच एक नवीन परिवहन सेवा 'सहकार टॅक्सी' सुरू करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 04:21 PM2022-06-18T16:21:42+5:302022-06-18T16:39:42+5:30

NFTC to launch Sahakar Taxi : नॅशनल टूरिझम अँड ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड (NFTC) लवकरच एक नवीन परिवहन सेवा 'सहकार टॅक्सी' सुरू करणार आहे.

nftc to launch sahakar taxi on lines of ola uber generate more than 10 lakh jobs | आता स्वस्तात करता येणार प्रवास, 'सहकार टॅक्सी' लवकरच होणार सुरू!

आता स्वस्तात करता येणार प्रवास, 'सहकार टॅक्सी' लवकरच होणार सुरू!

नवी दिल्ली : तुम्हीही अनेकदा ओला (Ola) किंवा उबरने (Uber) प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर लाखो लोकांना रोजगारही मिळणार आहे. दरम्यान, नॅशनल टूरिझम अँड ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड (NFTC) लवकरच एक नवीन परिवहन सेवा 'सहकार टॅक्सी' सुरू करणार आहे. येत्या काही वर्षांत लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे.

'सहकार टॅक्सी' सेवा ओला आणि उबरसारखीच असणार आहे. सहकारी संस्था आणि ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या माध्यमातून कुरिअर सेवाही सुरू करण्यात येणार असल्याचे एनएफटीसीकडून सांगण्यात आले. ही कुरिअर सेवा राज्यांमध्ये काम करणार आहे. निवेदनानुसार, एनएफटीसीने नॅशनल कॅपिटल रीजन (NCR) मध्ये एक नवीन सेंट्रल बोर्ड ऑफिस आणि युट्यूब (YouTube) चॅनल सुरू केले आहे. या नवीन संरचनेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रकल्प सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डीएन ठाकूर यांच्या हस्ते झाले होते.

10 लाख लोकांना मिळेल रोजगार
एनएफटीसीनुसार, येत्या काही वर्षांत 10 लाख लोकांना परिवहन सेवेद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 40 लाख लोकांना फायदा होणार आहे. याशिवाय, एनएफटीसीकडून सुरू करण्यात येणाऱ्या सेवेमुळे येत्या एक ते दोन वर्षांत रोजगार उपलब्ध होणार आहे. सहकार टॅक्सी, सहकार जल, सहकार रेस्टॉरंट, सहकार फूड सर्व्हिसद्वारे एनएफटीसीच्या माध्यमातून येत्या काही वर्षांत लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

Web Title: nftc to launch sahakar taxi on lines of ola uber generate more than 10 lakh jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.