Lokmat Money > बिझनेस न्यूज > निफ्टी दहा हजारांच्या पार; धातू आस्थापनाही वधारल्या

निफ्टी दहा हजारांच्या पार; धातू आस्थापनाही वधारल्या

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ने दहा हजार अंशांपार झेप घेताना नोंदविलेला सार्वकालीन उच्चांक आणि धातू आस्थापना निर्देशांकाचा सहा वर्षांमधील उच्चांक ही गतसप्ताहाची ठळक वैशिष्टे होत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:56 AM2017-10-16T00:56:12+5:302017-10-16T00:56:49+5:30

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ने दहा हजार अंशांपार झेप घेताना नोंदविलेला सार्वकालीन उच्चांक आणि धातू आस्थापना निर्देशांकाचा सहा वर्षांमधील उच्चांक ही गतसप्ताहाची ठळक वैशिष्टे होत.

Nifty crosses over ten thousand; Metal establishments also rose | निफ्टी दहा हजारांच्या पार; धातू आस्थापनाही वधारल्या

निफ्टी दहा हजारांच्या पार; धातू आस्थापनाही वधारल्या

- प्रसाद गो. जोशी

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ने दहा हजार अंशांपार झेप घेताना नोंदविलेला सार्वकालीन उच्चांक आणि धातू आस्थापना निर्देशांकाचा सहा वर्षांमधील उच्चांक ही गतसप्ताहाची ठळक वैशिष्टे होत. देशांतर्गत गुंतवणूकदारांची सुरू असलेली खरेदी, औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये झालेली वाढ, ग्राहक मूल्यावर आधारित चलनवाढीमध्ये स्थिरता आणि राजकीय स्थिरता यामुळे वातावरण चांगले होते.
गतसप्ताहात किरकोळ अपवाद वगळता बाजारामध्ये तेजीचा संचार राहिला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३२५०८.५९ आणि ३१७६९.४० अंशांदरम्यान हेलकावत अखेरीस ३२४३२.६९ अंशांवर स्थिरावला मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ६१८.४७ अंश म्हणजे १.९४ टक्के वाढ झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सप्ताहामध्ये १८७.७५ अंश म्हणजेच १.८८ टक्कयांनी वाढून १०१६७.४५ अंशांवर बंद झाला. दहा हजारांवर झेप घेतानाच या निर्देशांकाने सार्वकालीन उच्चांकाचीही नोंद केली, हे विशेष होय.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे १२६.५४ आणि २९६.४३ अंशांनी वाढून बंद झाले. बाजारात परकीय वित्तसंस्थाकडून सुरू असलेली विक्री कायम असून देशांतर्गत गुंतवणूकदार आणि परस्पर निधींकडून मात्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खरेदीमुळे बाजारातील वाढ कायम आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या धातू निर्देशांकाने सहा वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. धातू आस्थापनांची दुसºया तिमाहीमधील कामगिरी चांगली होण्याची अपेक्षा असून अनेक आस्थापनांनी आपल्या ५२ सप्ताहांमधील उच्चांकांची नोंद केली. वर्षभरातील वाढीचा विचार करता संवेदनशील निर्देशांकामध्ये २१.५ टक्के वाढ झाली असून धातू निर्देशांक मात्र ४२ टक्कयांनी वधारला आहे.
औद्योगिक उत्पादनामध्ये झालेली वाढ, चलनवाढीचा स्थिर झालेला दर आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज यामुळे जगभरातील बाजार तेजीत राहिले.

सहा महिन्यांत परस्पर निधींमध्ये २ लाख कोटी

देशातील परस्पर निधींच्या (म्युच्युअल फंड) विविध योजनांमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये २ लाख २ हजार १ कोटी रुपये गुंतविले गेले आहेत. यापैकी बहुसंख्य रक्कम ही समभाग संबंधित तसेच बॅलन्स फंडांमध्ये गुंतविण्यात आली आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीपेक्षा ही रक्कम ३२ हजार ५६३ कोटी रुपयांनी कमी आहे. गतवर्षी २, ३४, ६४ कोटी रुपये गुंतविले गेले होते.
एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये ही रक्कम गुंतविली गेली आहे. यापैकी सर्वाधिक रक्कम ८० हजार कोटी रुपये समभाग आणि भांडवल बाजाराशी संबंधित योजनांमध्ये जमा झाले आहेत. ४७ हजार कोटी बॅलन्स फंडांमध्ये तर २८ हजार ६०० कोटी लिक्विड आणि मनी मार्केट फंडांमध्ये भरले गेले आहेत. मात्र गोल्ड इटीएफ योजना भुंतवणूकदारांना फारशी भावलेली दिसत नाही. यामधून या कालावधीत ३८८ कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत.

Web Title: Nifty crosses over ten thousand; Metal establishments also rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.