Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: बजाजसह 'या' कंपन्यांच्या शेअर्सने पुन्हा केलं मालामाल! मार्केटमध्ये २ नवीन रेकॉर्ड

Stock Market Today: बजाजसह 'या' कंपन्यांच्या शेअर्सने पुन्हा केलं मालामाल! मार्केटमध्ये २ नवीन रेकॉर्ड

BSE Market Capitalisation: सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. बाजार बंद होताना थोडी घसरण झाली असली तरी आजच्या सत्रात २ विक्रम प्रस्थापित झालेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 04:58 PM2024-09-13T16:58:47+5:302024-09-13T17:01:50+5:30

BSE Market Capitalisation: सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. बाजार बंद होताना थोडी घसरण झाली असली तरी आजच्या सत्रात २ विक्रम प्रस्थापित झालेत.

nifty mid cap index closes at all time high small cap stocks to rally bse sensex nse nifty closes in red | Stock Market Today: बजाजसह 'या' कंपन्यांच्या शेअर्सने पुन्हा केलं मालामाल! मार्केटमध्ये २ नवीन रेकॉर्ड

Stock Market Today: बजाजसह 'या' कंपन्यांच्या शेअर्सने पुन्हा केलं मालामाल! मार्केटमध्ये २ नवीन रेकॉर्ड

Stock Market Closing Update : गुरुवारी जोरदार उसळी घेतलेल्या शेअर बाजाराने आजही आपली कामगिरी कायम ठेवली. परिणामी या आठवड्यातील शेवटचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी चांगले राहिले. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण झाली असली तरी आजच्या सत्रात बाजारात २ नवीन विक्रम झाले. ही कमाल मिड-कॅप आणि स्मॉलकॅपने केली आहे. आज कोणत्या शेअरने भाव खाल्ला आणि कोणता पडला. कुठल्या सेक्टरमध्ये प्रगती दिसली. शेवटच्या दिवशी नेकमं काय घडलं? चला जाणून घेऊ.

मिड-कॅप शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे, निफ्टी मिडकॅप इंडेक्सने पहिल्यांदाच 60,000 चा टप्पा ओलांडला आणि 60189.35 चा ऑलटाईम हायवर पोहचला. स्मॉलकॅप शेअर्समध्येही चांगली वाढ पाहायला मिळाली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या खरेदीमुळे, बीएसईवर लिस्टेड स्टॉक्सचे मार्केट कॅप पहिल्यांदाच 469 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले. बाजार बंद होताना BSE सेन्सेक्स 72 अंकांच्या घसरणीसह 82,890 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32 अंकांच्या घसरणीसह 25,356 अंकांवर बंद झाला.

सेक्टरॉल अपडेट
आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, मीडिया, रिअल इस्टेट, धातू आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर एफएमसीजी, एनर्जी, हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बूक झाला. आजच्या सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. निफ्टी मिडकॅप 100 ने ऑलटाईम उच्चांक गाठला आणि 60 हजार 34 वर बंद झाला. तर निफ्टीचा स्मॉल कॅप इंडेक्सही 151 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

मार्केट कॅप ऑलटाईम हायवर
मिड-कॅप, स्मॉल-कॅपसह बँकिंग आयटी शेअर्सच्या वाढीमुळे, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 468.80 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, तर शेवटच्या सत्रात ते 467.36 लाख कोटी रुपयांवर बंद झाले. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.44 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी ११ शेअर्स वाढीसह बंद झाले तर १९ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २० शेअर्स वाढीसह आणि ३० तोट्यासह बंद झाले. बजाज फायनान्स २.३१ टक्के, बजाज फिनसर्व्ह २.१७ टक्के, ॲक्सिस बँक १.१९ टक्के, इंडसइंड बँक १.१८ टक्के, टाटा स्टील १.०९ टक्के, टेक महिंद्रा ०.८० टक्के, टाटा मोटर्स ०.६१ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. घसरलेल्या समभागांमध्ये अदानी पोर्ट्स १.३७ टक्के, आयटीसी १.०१ टक्के, भारती एअरटेल ०.८८ टक्के आणि एनटीपीसी ०.७८ टक्क्यांनी घसरून बंद झाले.

Web Title: nifty mid cap index closes at all time high small cap stocks to rally bse sensex nse nifty closes in red

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.