Join us

निफ्टीने गाठला १४ हजारांचा टप्पा; २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक बघितले चढ-उतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 07:03 IST

मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने दिवसभरामध्ये ४७,८९६.९७ अशी नवीन उंची गाठली.

मुंबई : मुंबई : सन २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक चढ-उतार बघितले असले तरी वर्षाचा अखेरचा दिवस मात्र फारशी वाढ वा घट न होता गेला. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ने गाठलेला १४ हजार अंशांचा टप्पा तसेच सेन्सेक्स आणि निफ्टीने  केलेले नवीन उच्चांक हे गुरुवारचे वैशिष्ट्य ठरले. अनेक उतार-चढाव बघितलेल्या या वर्षामध्ये निर्देशांकांनी सुमारे १५ टक्के परतावा दिला आहे.  मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने दिवसभरामध्ये ४७,८९६.९७ अशी नवीन उंची गाठली. मात्र त्यानंतर तो ही खाली आला. दिवसअखेर हा निर्देशांक ५.११ अंशांनी वाढून ४७,८९६.९७ अंशांवर बंद झाला. 

टॅग्स :शेअर बाजार