प्रसाद गो. जोशीचीनमध्ये कोविड रुग्णांची पुन्हा सुरू झालेली वाढ, अमेरिकेमधील कोविडची साथ लांबण्याची दिसत असलेली चिन्हे, अशा निराशाजनक पार्श्वभूमीवर आंतरराष्टÑीय बाजारामध्ये मंदीचे वातावरण होते. मात्र, भारतामध्ये काही प्रमाणात सुरू झालेल्या व्यवहारांमुळे भारतीय अर्थव्यवस्था लवकरच वाढीला लागेल या विश्वासाने गुंतवणूकदार पुढे येत आहेत. परिणामी, शेअर बाजारामध्ये वाढ झालेली दिसून आली.मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. त्यानंतर बाजार ३४,९२७.८० अंशांपर्यंत वाढला होता, मात्र वाढीव बाजाराचा फायदा उठविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे सप्ताहाच्या अखेरीस बाजार काहीसा आला. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांकाने (निफ्टी) सप्ताहाच्या अखेरीस ओलांडलेली १० हजार अंशांची पातळी ही मानसिकदृष्ट्या बळ देणारी ठरली आहे. याशिवाय स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये झालेली चांगली वाढ या निर्देशांकाला १२ हजारांच्या जवळ घेऊन जात आहे.परकीय वित्तसंस्थांनी निवडक समभागांमध्ये गुंतवणूक केली असली तरी सप्ताहाचा विचार करता या संस्थांनी ३३२१.९० कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांनी सप्ताहामध्ये २६५६.५५ कोटींची खरेदी केली आहे. जून महिन्यात आतापर्यंत परकीय वित्तसंस्थांनी ८८७३.८१ कोटींची गुंतवणूक केली आहे.>देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये वाढपरकीय चलनातील मालमत्तेचे मूल्य वाढल्यामुळे देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये ५.९४ अब्ज डॉलरची वाढ होऊन ती आता ५०७.६४ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. ५ जून रोजी संपलेल्या सप्ताहातच गंगाजळीने ५०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला होता.
गुंतवणूकदारांच्या आशावादामुळे निफ्टी, सेन्सेक्समध्ये झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 1:24 AM