Yamini Rangan Nikesh Arora : 2024 मध्ये अमेरिकेत सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींनी स्थान मिळवले आहे. यामिनी रंगन आणि निकेश अरोडा यांचा कन्सेप्शन अॅक्चुअली पेड (CAP) आधारावर तयार करण्यात आलेल्या यादीत समावेश आहे. गुगलचे सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांना दोघांनी मागे टाकले आहे.
निकेश अरोडा हे पालो अल्टो नेटवर्क्सचे सीईओ आहेत. ते यादीत दहाव्या स्थानावर आहेत. तर हबस्पॉटच्या सीईओ यामिनी रंगन या आठव्या स्थानी आहेत.
रंगन यांनी २०२३ या आर्थिक वर्षात २.५८ कोटी डॉलर म्हणजे जवळपास २१७ कोटी रुपये इतके वेतन दिले गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या पगारात दुप्पट वाढ झाली आहे.
५६ वर्षांचे निकेश अरोडा यांना २०२३ मध्ये १५.१४ कोटी डॉलर म्हणजे जवळपास १,२७० कोटी रुपये इतके वेतन दिले गेले आहेत. त्यांचा CAP २६.६४ कोटी डॉलरपेक्षाही जास्त आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या २०२३ च्या यादीत निकेश अरोडा हे १५.१४ कोटी डॉलर कमाईसह दुसऱ्या स्थानी होते. एडोबचे सीईओ शांतनु नारायण ४.४९ कोटी डॉलरसह ११ व्या स्थानी होते. तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी २०२३ मध्ये ८८ लाख डॉलर कमाई केली आहे.
कोण आहेत यामिनी रंगन?
यामिनी रंगन या HubSpot च्या सीईओ आहेत. सीईओ बनण्याआधी याच कंपनीमध्ये त्या चीफ कस्टमर ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्या मार्केटिंग, सेल्स आणि सर्व्हिस अशा टीमचे काम बघायच्या. टेक्नॉलॉजी उद्योगातील त्यांना २४ वर्षांचा अनुभव आहे.
भारतातील कोइंबतूर येथील भारथिअर विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर बर्कलेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातून कम्प्युटर इंजिनिअरची पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी एमबीए केले.
निकेश अरोडा कोण आहेत?
सीईओ निकेश अरोडा यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील एअरफोर्स पब्लिक स्कूलमध्ये झाले. बनारस हिंदू विद्यापीठातंर्गत येत असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअर विषयात बी. टेक केले. बॉस्टन कॉलेजमधून फायनान्समध्ये एम.एस. पूर्ण केले. नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून बिझनेस अडमिनिस्ट्रेशनमध्ये एम.एस. पूर्ण केले.