लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ब्रोकरेज संस्था ‘जीरोधा’चे सहसंस्थापक निखिल कामत यांनी आपली अर्धी (५०%) संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. कामत हे ‘द गिव्हिंग प्लेज’ मोहिमेत सहभागी होणारे सर्वाधिक कमी वयाचे भारतीय ठरले आहेत.
मोहिमेची सुरुवात बिल गेट्स आणि दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी केली होती. अझिम प्रेमजी, किरण मजूमदार-शॉ, रोहिणी आणि नंदन नीलेकणी यांच्यानंतर निखिल कामत यांचा माेहिमेत सहभाग झाला आहे. माेहिमेतून संपत्तीचा मोठा हिस्सा समाजहितासाठी दान केला जाताे.
या संस्थेला दान
हवामान बदल, ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रासाठी संपत्ती दान करण्याची कामत यांची योजना आहेत. ही रक्कम कामत यांच्या स्वत:च्या ‘यंग इंडियन फिलँथ्रॉपिक प्लेज’ या संस्थेला देण्यात येणाऱ्या देणगीच्या व्यतिरिक्त आहे.
फोर्ब्सनुसार, ३५ वर्षीय निखिल कामत यांची संपत्ती १.१ अब्ज डॉलर (९ हजार कोटी रुपये) आहे.