मुंबई : नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्याची प्राप्तिकर विभागाला आठ महिने आधीच माहिती होती, पण या माहितीची तपास यंत्रणांना देवाण-घेवाण करण्यासंबंधीची यंत्रणा नसल्याने त्यांनी तपास संस्थांना त्याची सूचना दिलीच नाही, असे विभागाच्या अहवालात समोर आले आहे.
खरेदीसंबंधीचे बनावट दस्तावेज, हिऱ्यांच्या स्कॉकची भरमसाठ वाढविलेली किंमत, नातेवाइकांकडे वळविलेली रक्कम, संशयास्पद कर्जे अशा प्रकारच्या कामात नीरव मोदी व त्याच्या सर्व कंपन्या व्यस्त असल्याचे प्राप्तिकर विभागाला हा घोटाळा बाहेर येण्याच्या आठ महिने आढळले होते. त्याची सूचना त्यांनी त्याच वेळी सीबीआय, महसूल गुप्तहेर संचालनालय (डीआरआय) किंवा अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यासारख्या तपास संस्थांना दिली असती, तर मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी यांना त्याच वेळी अटक करता आली असती, असे प्राप्तिकर विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.
प्राप्तिकर विभागाने आता या संस्थांना घोटाळा उघड झाल्याच्या आठ महिने आधीचा १० हजार पानी अहवाल अलीकडेच अन्य तपास ंयंत्रणांना सोपविला आहे. त्यानुसार, पुढील तपास होणार आहे.
>चार महिन्यांनी तपास यंत्रणांकडे धाव
पंजाब नॅशनल बँकेचे १३,५०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून निरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कुटुंबासह भारतातून पलायन केले. एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर चार महिन्यांनी तपास संस्थांनी प्राप्तिकर विभागकडे धाव घेतली. यासंबंधी आर्थिक गुप्तहेर युनिटकडे असलेले सर्व दस्तावेज तत्काळ देण्याची सूचना तपास संस्थांनी जुलै-आॅगस्टमध्ये प्राप्तिकर विभागाकडे केली.
नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्याची आठ महिने आधीच होती माहिती!
नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्याची प्राप्तिकर विभागाला आठ महिने आधीच माहिती होती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:27 AM2018-12-04T05:27:31+5:302018-12-04T05:27:42+5:30